व्यक्ती-परिचय

शिरीष व्यंकटेश पै

Category:

 

कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणार्‍या लेखिका शिरीष पै. ‘गेल्या दहा हजार वर्षांत असं व्यक्तिमत्त्वं झालं नाही’ अशा व्यक्तिमत्त्वाच्या आचार्य अत्रे यांची शिरीष पै ही कन्या.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

हिराबाई बडोदेकर

Category:

 

ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फत्त* माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

मनमोहन नातू

Category:

 

उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यांच्या मनावर मोहिनी घालणारे लोककवी मनमोहन नातू यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण ‘लोककवी मनमोहन’ या नावानेच ते महाराष्ट्राला माहीत आहेत.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

केशव तानाजी मेश्राम

Category:

 

७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

कृष्ण गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)

Category:

 

आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर. २० जानेवारी १८९८ ला यांचा जन्म झाला.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

गुरुनाथ आबाजी (जीए) कुलकर्णी

Category:

 

माणसाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा, यश, अपयश या सगळ्यामध्ये गुंडाळले गेलेले माणसामाणसामधील संबंध त्यातून ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि आतक्र्य नियतीचे खेळ, त्यातून येणारी अर्थशून्यता या सगळ्याचा प्रत्यय देणारी कथा म्हणजे जी. एं. ची कथा. असा आगळावेळा कथाकार महाराष्ट*ाला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्यच. जी. ए. कुलकर्णींचा जन्म तालुका चिपोडी येथील एकसंबा या गावी १० जुलै १९३२ साली झाला.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

पंडित हृदयनाथ मंगेशकर

Category:

 

मंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

इरावती कर्वे

Category:

 

समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे.

  January 22, 2010


व्यक्ती-परिचय

डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस

Category:

 

भारत व चीन या दोन देशांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसर्‍या चीन जपान युध्दाच्या पार्श्वभूमीवर, भारताने चीनमध्ये आपत्ग्रस्त वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या ५ वैद्यकीय तज्ञांपैकी ते एक होते. अचूक वैद्यकिय कौशल्ये, प्रसंगवधानी स्वभाव, व असामान्य नेत्तृत्वगुणांमुळे कित्येक जखमी चिनी नागरिकांन व सैनिकांना पुनर्जीवन मिळाले होते.

  January 22, 2010


गजानन दिगंबर माडगूळकर
व्यक्ती-परिचय

गजानन दिगंबर माडगूळकर

Category:

 

अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!

  January 22, 2010