व्यक्ती-परिचय

श्रीपाद नारायण पेंडसे (श्री. ना. पेंडसे)

Category:

 

मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणार्‍या श्रीपाद नारायण पेंडसे म्हणजेच श्री. ना. पेंडसे यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ साली झाला. पेंडस्यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. ‘गारंबीचा बापू’, ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं.

  February 2, 2010


व्यक्ती-परिचय

विद्याधर गोखले

Category:

 

ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे.

  February 2, 2010


विष्णू सखाराम खांडेकर
व्यक्ती-परिचय

विष्णू सखाराम खांडेकर

Category:

 

शब्दप्रभुत्व, कल्पनावैभव, कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे महाराष्ट्रातले श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक पद्मभूषण विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पहिले मराठी साहित्यिक.

  February 2, 2010


व्यक्ती-परिचय

नाथ पै (बॅरिस्टर नाथ पै)

Category:

 

अतिशय विद्वान आणि गोरगरिबांविषयी आत्मीयता असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ले येथे दि. २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले.

  February 2, 2010


व्यक्ती-परिचय

सावित्रीबाई फुले

Category:

 

उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या धर्मपत्नी. १८४० साली त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचा ज्योतिबांशी विवाह झाला.

  February 2, 2010


लेखसंग्रह

लोकांनी करावे तरी काय ?

Category:

 

जगातील आश्चर्यांची माध्यमांत नेहमीच चर्चा होत असते. मागे एकदा एका संस्थेने जगातील सात आश्चर्यांची निवड करण्यासाठी विश्वव्यापी जनमत नोंदणी अभियानदेखील राबविले होते. आपला ताजमहालदेखील त्या स्पर्धेत होता, अर्थात नंतर तो एकूण प्रकारच अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले; परंतु लोकांची उत्सुकता चाळविण्यात ती मोहीम नक्कीच यशस्वी झाली होती.

  January 31, 2010


व्यक्ती-परिचय

दीनानाथ मंगेशकर

Category:

 

तेजस्वी, पल्लेदार, धारदार आवाज, सूरनळ्यातून रंगीबेरंभी स्फुल्लिग उडून यावे अशाप्रकारे गळयातून बाहेर पडणार्या ताज्या सुंदर, ढंगदार चिजा, ठुमर्या, दादरे या गायकीच्या गुणांबरोबरच आवाजातील उंची, रूंदी, जोर या गुणांचे मिश्रण ज्यांच्या आवाजात आढळत असे, ते ज्येष्ठ श्रेष्ठ गायक दीनानाथ गणेश मंगेशकर. दीनानाथांचा जन्म गोमांतकातील मंगेशी या गावी २९ डिसेंबर १९०० रोजी झाला.

  January 30, 2010


व्यक्ती-परिचय

मुरलीधर देविदास आमटे (बाबा आमटे)

Category:

 

समाजसुधारक, विचारवंत, कवी आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट काम उभारणारे एक भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

  January 30, 2010


व्यक्ती-परिचय

मधू लिमये

Category:

 

अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ. चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये यांचा जन्म पुणे येथे १ मे १९२२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले. १९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

  January 30, 2010


व्यक्ती-परिचय

विठ्ठल रामजी

Category:

 

‘ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि सर्व चळवळींना नैतिक अधिष्ठान असले पाहिजे’ असे उदात्त विचार आणि तपस्वी जीवनाचा पुरस्कार करणारे विठ्ठल रामजी तथा महर्षी अण्णासाहेब शिदे. जमखिडी येथील एका धार्मिक कुटुंबात १८७३ ला अण्णासाहेब शिद्यांचा जन्म झाला.

  January 30, 2010