साहित्य - ललित

मांजरीच्या गळ्यात घंटी/एक अयशस्वी प्रयत्न

Category:

 

मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला होता. सहज लक्ष गेल त्या घंटीवर ‘लोकपाल’ असे शब्द कोरलेले होते. एक अयशस्वी प्रयत्न

  January 26, 2012


अवर्गिकृत

विज्ञान आणि अध्यात्म – पूर्ण ब्रम्ह.

Category:

 

ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.

पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.

हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.

पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.

.

  January 20, 2012


अवर्गिकृत

आरक्षण…सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत!

Category:

 

“मुस्लिम मागासवर्गाला आरक्षण”…निवडणुकांच्या तोंडावर घोषित आरक्षणाला सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत म्हटलं तर वावगे ठरेल का?…‘नॉन-क्रिमीलेअर’ सारख्या जाचक अटीमुळे ओबीसी, विमुक्त जाती, एस.बी.सी. व भटक्या जमातींना इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या कितीतरी सेवापदांना मुकावे लागले. ‘नॉन-क्रिमीलेअर’ या अटीची व्याख्या “उच्चवर्णीयांतील प्रत्येकजण श्रीमंत नसतो तसचं मागासवर्गातील प्रत्येकजण गरीब नसतो” या सिद्धांताला अनुसरून त्यांना समान पातळीवर आणायचे असेल तर मग उच्चवर्णीयांसहित सरसकट सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का नाही?. आरक्षणासाठी फक्त जातींचाच व अल्पसंख्याकांचाच आधार का ?.केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणातून नेमका कोणत्या गोष्टीचा मागासलेपणा एका समान पातळीवर शासन आणू पाहतेय.

  January 19, 2012


लेखसंग्रह

चीनची आर्थिक घुसखोरी

Category:

 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे.

  January 17, 2012


लेखसंग्रह

डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एक बहुआयामी व्यक्तिमत्व

Category:

 

रत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणांचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो. डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात. पावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते. || ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||

  January 16, 2012


क्रीडा-विश्व

धोनी आणि कंपनीचा “धोबीघाट” !!!!!

Category:

 

बरे झाले एकाअर्थी. त्यांना कोणीतरी जमीनीवर आणायलाच हवे होते. भारताच्या कागदी वाघांचा पतंग उगाचच भरार्‍या घेत होता आणि लोकांनाही मूर्ख बनवत होता. आम्ही जगातले सर्वोत्कृष्ट “क्रिकेटवीर” आहोत याचा आम्हाला माज होता. तो नेमका मकरसंक्रांतीच्या दिवशीच कांगारुंनी उतरवला.

  January 15, 2012


लेखसंग्रह

घरोघर शिवाजी निर्माण करा!

Category:

 

आमच्या माता शिक्षित असायला हव्यात आणि माता-पित्यानंतर ज्यांना स्थान दिले जाते ते गुरूजन तितक्याच तोलामोलाचे असायला हवेत. मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याला अत्युच्च दर्जाचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी संसाधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत. उद्याचा भारत बलवान करायचा असेल, नोबल पारितोषिक विजेते भारतातही घडवायचे असतील, तर आजच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या सगळ्याच दृष्टीने मजबूत करणे भाग आहे.

  January 14, 2012


लेखसंग्रह

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता

Category:

 

भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो.

  January 14, 2012