लेखसंग्रह

श्री गणेश अवतारलीला १० – श्री पंचकन्यापती गणेश

Category:

 

भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती, श्री विष्णूंनी पुष्टी, श्री शंकरांनी योगिनी, देवी आदिशक्तीने मोहिनी आणि भगवान श्री सूर्यांनी संजीवनी नामक कन्येला निर्माण करून आपल्या या कन्या भगवान गणेशांना समर्पित केल्या. या पाच कन्यांशी विवाह केल्याने श्रीगणेशांना पंचकन्यापती गणेश म्हणतात.

लेखसंग्रह

आत्मपूजा उपनिषद : १ : स्वस्मरण हेच ध्यान !

Category:

 

आत्मपूजा उपनिषद केवळ १५ श्लोकांचं आहे आणि त्याच्या  प्रत्येक श्लोकात स्वतःचा उलगडा घडवून आणण्याची किमया आहे; म्हणून ही लेखमाला. : सर्व प्रस्थापित अध्यात्मात मी हा एकमेव अडथळा मानला गेला आहे. या मी लाच सर्वेजन अहंकार  समजतात आणि तो हटवण्यात साधकांचं आयुष्य वेचलं जातं; तरी तो हटत नाहीच.

लेखसंग्रह

श्री गणेश अवतारलीला ११ – श्री वल्लभेश अवतार

Category:

 

निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय.

लेखसंग्रह

शिव ताण्डव स्तोत्रम् – मराठी अर्थासह

Category:

 

लंकेचा अधिपती रावण याचेबद्दल त्याच्या रामायणातीळ भूमिकेमुळे भारतातील अनेक लोकांच्या मनात अपसमज व अप्रीती दिसून येते. प्रत्यक्षात रावणाचे व्यक्तिमत्त्व खूपच भिन्न आहे. व्यापार,राज्यशास्त्र, आयुर्वेद,दर्शने,बुद्धिबळ यात तो पारंगत होता. संगीताचा रसिक दशानन रुद्रवीणेचा उत्कृष्ट वादकही होता. देवांना पराभूत करून बंदिवान करणारा शूरवीर रावण परम शिवभक्त होता. एक सक्षम राज्यकर्ता असलेल्या रावणाच्या लंकेची व जनतेची भरभराट झाली होती. काही अभ्यासकांच्या मते तो दशग्रंथी विद्वान होता. संस्कृतचा प्रकांडपंडित असलेल्या रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, अर्कप्रकाशम्, शिवतांडव स्तोत्रम् इ. रचना केल्याचे सांगितले जाते.

लेखसंग्रह

आत्मपूजा उपनिषद : २ : कर्मशून्य चित्त हेच आवाहन !

Category:

 

सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो;  केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे.

लेखसंग्रह

श्रीमुद्गलपुराण – १०

Category:

 

भगवान श्री शंकरांनी स्थापिलेले श्री क्षेत्र रांजणगाव, भगवान श्री विष्णूंनी तपस्या केलेले श्रीक्षेत्र सिद्धटेक, भगवान ब्रह्मदेवांची तपोभूमी श्रीक्षेत्र थेऊर, देवी पार्वतीची आराधना क्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री, भगवान श्री सूर्य स्थापित श्री हेरंब गणेश श्रीक्षेत्र काशी अशा रुपात पंचेश्वरांनी केलेली गणेशोपासना पाहता येते.

लेखसंग्रह

मोरया माझा – ११ : श्री गणेश खरेच शिवपुत्र आहेत का?

Category:

 

दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही.