भिती – एक भयंकर गोष्ट
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनभिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो.