आता खेड्याकडे चला
Category:
लेखसंग्रहमी एकदा ठाणे इंडस्ट्रीअल विंग या संस्थेतर्फे एक सहलीकरिता जात होतो. सर्व सभासद मिळून दोन खासगी बस तयार केली. त्यावेळेस माळशेज घाट हा फार प्रसिद्ध होता. आम्ही ठाणे, कल्याण मुरबाडने थेट माळशेज मार्गानी जुन्नरपर्यंत जावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी ५ ते ६ ।। वाजता आम्ही निघालो होतो. ठाणे, कल्याण, मुरबाड करीत आम्ही माळशेज घाटाला जाता जाता खूप बस अत्यंत धीम्या गतीने जात होती. आणि शेवटी थांबली.