भारतीय स्वातंत्र्य आणि स्वदेशी
Category:
लेखसंग्रहस्वातंत्र्याचा लढा व स्वदेशी चळवळ हा विषय समजून घेताना इ.स. १८५० च्या पूर्वी देखील जे स्थानिक उठाव झाले त्याचीही पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. यात शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केल्याचे दिसून येते.