अवर्गिकृत

खेळावेसे वाटले म्हणून

Category:

 

पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास.

  December 24, 2024


व्यक्ती-परिचय

प्रेरणा अंध नसतें

Category:

 

अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार.

  December 24, 2024


लेखसंग्रह

ज्येष्ठांचे आयडियल आरोग्य

Category:

 

म्हातारपण म्हणजे दुसऱ्यांदा जगण्याचे बालपण. आपले वय जसे जसे वाढत जाईल तसे तसे आपला विचार करण्याचा दर्जा हा वाढतच गेला पाहिजे. म्हातारी माणसं नेहमी म्हणत असतात की आम्ही इतके पावसाळे पाहिले आहेत. पण पावसामुळे तुमच्यात किती पाणी शिरले आणि त्या पाण्याचा तुम्ही किती आणि कसा उपयोग केला यावर तुम्ही अनुभवापासून काय काय शिकला ते ठरत असते.

  December 20, 2024


साहित्य - ललित

मृगजळ

Category:

 

एका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती,  त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा .

  December 19, 2024


अवर्गिकृत

भेटवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

Category:

 

अभिषेकची आणि माझी फारफारतर गेल्या दोन अडीच वर्षांतीलच ओळख असेल. तसं म्हंटले तर हा कालखंड काही फार मोठा मानता येणार नाही. अगदी नेमकं सांगायचे तर २०१८ सालच्या ठाणे हिरानंदानी मॅरेथॉनच्या आसपास आमची जुजबी ओळख झाली असावी. मी नुकतीच गोल्ड जिम जॉईन केली होती. एक शशी दळवी सोडला तर बाकी कोणालाच मी फारसा ओळखत नव्हतो. एकदा

  December 17, 2024


लेखसंग्रह

स्त्रियांचे आयडियल आरोग्य

Category:

 

मैत्रिणींनो आज आपण खूप शिकलो. सुसंस्कृत झालो, बऱ्यापैकी कमावतोही, मुलांना पण चांगले शिक्षण देतो, आपल्या घरासाठी तर आपण काय काय करत असतो, पण हे सगळे करताना स्वत:कडे किती लक्ष देतो? कधीतरी अचानक थकवा जाणवायला लागला म्हणून कुणीतरी डॉक्टरकडे गेलेच तर रक्त तपासल्यावर कळले तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी आहे म्हणून रक्त म्हणजे आपल्या शरीरातील जीवन शक्ती, तीच कमी झाली तर? असे म्हणतात की, भरतातील ७० टक्के स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असते.

  December 16, 2024


साहित्य - ललित

टॅक्सी नंबर

Category:

 

समर चे वडील म्हणजेच किशोरीलाल पाठक हे शिस्तीचे दुसरं नाव होतं. भरतपूर मधल्या सरिता आश्रम आणि त्या आश्रमाच्या शाळे साठी त्यांनी आपलं उभ आयुष्य वेचलं होतं. शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवताना त्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि शिस्त हेच दोन मार्ग अवलंबले होते.. अर्थात शाळेच्या ह्या शिस्ती मध्ये घरात देखील एकुलत्या एक समर साठी कसली ही सवलत नसायची , जो अभ्यास आणि शिकवण शाळेतील इतर मुलांसाठी होती तीच समर साठी असायची .

  December 15, 2024


व्यक्ती-परिचय

उमादेवी ते टूणटूण – गायिका ते हिन्दी चित्रपटसृष्टीतील पहिली विनोदी अभिनेत्री

Category:

 

…… …. .पण तो सीन करताना तिच्या वजनाने ती कॉटमध्ये पडते . तेव्हा दिलीपकुमार हसला व म्हणाला “ अरे इस  टूणटूण को कोई उठाओ” तिला ते नाव आवडले व तिने आपले नामकरण टूणटूण केले.आपल्या शारीरिक व्यंगांवर विनोद करून घेणे सोपी गोष्ट नाही.

  December 15, 2024