आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-ब
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्हणजे अशी शंका मांडण्यापूर्वी त्यांनीं कांहीं गोष्टी ध्यानांत घ्यायला हव्या. एक म्हणजे भारतातील हवामान. भारतातल्या मान्सूनच्या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्य ऐतिहासिक सत्यही येथें लक्षात घ्यायला हवें.
March 25, 2019