युगमानव
Category:
कथा साहित्य - ललित“तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते
