No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

येथ जाति कुळ अप्रमाण

Category:

 

संत ज्ञानेश्वरांच्या या कवितेचे रसग्रहण – ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सामान्यांना न झेपणारे मार्ग आणि ज्ञानेश्वरांना तर सामान्यांचा कळवळा. ज्ञानेश्वरांनी सामान्यांना पटणारा, रुचणारा आणि झेपणारा असा जो भक्तिमार्ग त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. ज्ञानेश्वरांना ‘गुरुमाऊली’ म्हणून संबोधले जाते. याचे कारण आईने जसे लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावे तसे त्यांनी जनसामान्यांना भक्तिमार्गावरून चालायला शिकवले. वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

p-485-solapur-chaddar
शहरे आणि गावे

चादरींचे माहेरघर सोलापूर

Category:

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्‍या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे.

No Picture
कथा

युगमानव

Category:

 

“तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते

भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर
पर्यटनस्थळे

भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर

Category:

 

हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

कोलंबसाचे गर्वगीत

Category:

 

‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

p-560-Nagpur-Zero-Mile-Stone-550
शहरे आणि गावे

नागपूरमधील शून्य मैलाचा दगड

Category:

 

नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड.

मी सरकारी डॉक्टर
इ-पुस्तके

मी सरकारी डॉक्टर

Category:

 

‘डॉक्टर जिवंत तर समाजही जिवंत’…. या ध्येय वाक्याने प्रेरित डॉ. कुमार ननावरे यांनी तेहतीस वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा व व्यथा ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकातून जनतेपुढे प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.

त्यांनी केलेले कामकाजाचे व घटनांचे चित्रण खरोखरच विलक्षण व हृदयाचा ठाव घेणारे आहे. समाजाचे आरोग्य सुधारावे, सामान्य गोरगरीब जनतेची सेवा माफक दरात व्हावी हीच त्यांची धडपड !

आजच्या काळात धाडसाने असे अनुभव कथन करणारे डॉक्टर विरळेच. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी राहणे व शासनाने, आरोग्य खात्याने किंवा संबंधितांनी त्यांच्याविषयी गैरसमज वा आकस न करावा ही अपेक्षा.