झरे वाहती शुभ्र फेसाळ कैसे
कुणी योजिल्या भव्य येथे शिळा
तरुवल्लर्रीचे इथे मुक्त गाणे
फुले डोंगराचा पिसारा निळा
Author
Post Views: 7
झरे वाहती शुभ्र फेसाळ कैसे
कुणी योजिल्या भव्य येथे शिळा
तरुवल्लर्रीचे इथे मुक्त गाणे
फुले डोंगराचा पिसारा निळा
‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. […]
‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. […]
संत ज्ञानेश्वरांच्या या कवितेचे रसग्रहण – ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सामान्यांना न झेपणारे मार्ग आणि ज्ञानेश्वरांना तर सामान्यांचा कळवळा. ज्ञानेश्वरांनी सामान्यांना पटणारा, रुचणारा आणि झेपणारा असा जो भक्तिमार्ग त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. ज्ञानेश्वरांना ‘गुरुमाऊली’ म्हणून संबोधले जाते. याचे कारण आईने जसे लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावे तसे त्यांनी जनसामान्यांना भक्तिमार्गावरून चालायला शिकवले. वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. […]
Copyright © 2025 | Marathisrushti