कळी लाजते पानात
तिला खुणावतो वारा
बसे डोलवित मान
अंगी फुटतो शहारा..
Author
Post Views: 3
कळी लाजते पानात
तिला खुणावतो वारा
बसे डोलवित मान
अंगी फुटतो शहारा..
संत ज्ञानेश्वरांच्या या कवितेचे रसग्रहण – ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सामान्यांना न झेपणारे मार्ग आणि ज्ञानेश्वरांना तर सामान्यांचा कळवळा. ज्ञानेश्वरांनी सामान्यांना पटणारा, रुचणारा आणि झेपणारा असा जो भक्तिमार्ग त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. ज्ञानेश्वरांना ‘गुरुमाऊली’ म्हणून संबोधले जाते. याचे कारण आईने जसे लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावे तसे त्यांनी जनसामान्यांना भक्तिमार्गावरून चालायला शिकवले. वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. […]
चकोर पक्षी हा कोवळ्या चंद्रकिरणातील अमृत पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. चंद्रकिरणामधे शीतलता, मृदुता आणि संजीवकता असते. तिचा लाभ चकोराला होतो. असे हळुवार चंद्रकिरणांसारखे मृदुत्व योग्याच्या ठिकाणी असते. हे मृदुत्व आणखी कोणासारखे? तर पक्षिणीच्या पंखासारखे असते. आईच्या पंखांचा आश्रय हे पिलांचे सर्वस्व असते. कारण पंखांमुळे त्यांना उबारा मिळतो. पिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. योगी पुरुषांचेही असेच असते. त्यांच्यामुळे सर्वसा […]
आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे. […]
Copyright © 2025 | Marathisrushti