लेखसंग्रह

ओळख मूल्यांकाची भाग ३ – मूलांक ३

Category:

 

अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक ३ चा शासक ग्रह गुरू असून हा सात्विक, शुद्ध आणि सौम्य ग्रह मानला जातो.

  February 28, 2026


ऐतिहासिक

विश्वकर्मा शिल्पकार: आरंभिक इतिहास कालखंड

Category:

 

बुद्ध धर्माचा बुद्ध आणि महावीर यांच्या तत्व विचाराचा अत्यांतिक प्रभाव ज्या कालखंडावर जाणवतो तो कालखंड म्हणजे बुद्ध जन्म शतक इ. स. पूर्व ६०० ते गुप्त राजवटीचे आधी म्हणजे इ. स. ३०० पर्यंत होय. यालाच आरंभिक इतिहास कालखंड म्हटले आहे. या कालखंडात विश्वकर्मा समाजाच्या कला कौशल्यात जे बदल घडले, ते त्यांच्या कला कौशल्यातूनच स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बुद्धाच्या आणि महावीरांच्या तत्व प्रभावाने समाजात वेगळी सामाजिक जाण निर्माण झाली. त्यांचा परिणाम धर्म विचार, कला कारागीरी व भाषा या मूलभूत सांस्कृतिक मुल्यांवर पडला तरी परंतु परंपरेने चालत आलेले वैदिक मत, वैष्णव मत, शैव मत, शाक्त मत, सौरमत आणि मंखलिपुत्त गोसालाचे आजीविकमत आपापल्या परीने राज्यकर्त्यावर व समाजावर प्रभाव गाजवितच होते. सम्राट अशोकाने अंगीकार केल्यानंतर धर्म प्रचारासाठी स्तूप, विहार, स्तंभ निर्माण करविले, व त्यावर बुद्ध धर्माचे सिद्धांत, सदाचार, नैतिकता व धार्मिक गोष्टी कोरल्या. मौर्याचे उत्तराधिकारी शुंग वैदिक धर्माचे उपासक होते तरी ते बौद्ध धर्माप्रति सहिष्णु असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या शासन काळात भारहुत, मथुरा, बौधगया, सांची येथे अनेक बौद्ध स्तूपांची निर्मिती झाली.

  February 28, 2026


लेखसंग्रह

ओळख मूलांकाची – मूलांक ५

Category:

 

अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) ५ हा अंक खूप खास मानला जातो.

  February 28, 2026


लेखसंग्रह

अक्कलकोटच्या नवीन राजवाड्यातील आशिया खंडातील सर्वात मोठं शस्र संग्रहालय

Category:

 

राजे फत्तेसिंह भोसले (तिसरे) यांना वेगवेगळी शस्त्रे जमवण्याचा छंद होता. त्यांनी रणांगणावरील पराक्रम गाजवलाच तो पराक्रम गाजवणारी पण त्याबरोबर असंख्य शस्त्रेही जमवली. त्या संग्रहातून अक्कलकोटचे हे शस्त्रागार १९२२ साली आकाराला आले. सुरुवातीची अनेक वर्षे संग्रहालय अक्कलकोटचा जुन्या किल्लेवजा राजवाड्यात होते, ते सुरक्षिततेच्या कारणास्तव २००२ मध्ये नव्या राजवाड्यात हलवण्यात आले. अकराशे तलवारी, दोनशेहून अधिक बंदुका, तेवीस लहानमोठ्या तोफा, बावन्न पिस्तुले; तसेच, कट्यार, गुप्ती, बिचवे, खंजीर, भाले, परशू, अंकुश, वाघनखे, बाण आणि आणखी कितीतरी…. त्या हत्यारांचे वैविध्य आणि संख्याबळच प्रेक्षकाचे डोळे दिपवून टाकते.

  February 16, 2026


लेखसंग्रह

बाळगुटी एक वरदान: भाग १० – बहुउपयोगी सुंठ

Category:

 

मराठीत सुंठीवाचुन खोकला गेला अशी एक म्हण आहे. यातच सुंठीचे व्यवहारातील औषधी महत्व अधोरिखित होते. सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला चुन्यामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते.

  February 16, 2026


लेखसंग्रह

ओळख मूलांकांची : मूलांक २

Category:

 

मूलांक २ (जन्म २, ११, २०, २९ तारखेला) असलेले लोक शांत, संवेदनशील, बुद्धिमान आणि मनमिळाऊ स्वभावाचे असतात, जे चंद्रदेवाच्या प्रभावाखाली असतात; ते मनाने सुंदर असून इतरांकडे लवकर आकर्षित होतात, पण आत्मविश्वासाची कमतरता असू शकते, म्हणून त्यांना प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची गरज असते. हे लोक शांत, संवेदनशील, सर्जनशील आणि सहकार्य करणारे असतात, ज्यांना इतरांसोबत वेळ घालवायला आवडतो; ते कठीण परिस्थितीत धीर धरतात, पण त्यांना कामासाठी सतत प्रोत्साहनाची गरज असते, असे अंकशास्त्र सांगते. त्यांचे स्वामी ग्रह चंद्र असून, ते भावनिक, बुद्धिमान आणि समतोल लोक मनाने श्रीमंत असतात. हे लोक बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी ठरतात.

  February 13, 2026