लेखसंग्रह

ओळख मूलांकांची : मूलांक २

Category:

 

मूलांक २ (जन्म २, ११, २०, २९ तारखेला) असलेले लोक शांत, संवेदनशील, बुद्धिमान आणि मनमिळाऊ स्वभावाचे असतात, जे चंद्रदेवाच्या प्रभावाखाली असतात; ते मनाने सुंदर असून इतरांकडे लवकर आकर्षित होतात, पण आत्मविश्वासाची कमतरता असू शकते, म्हणून त्यांना प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची गरज असते. हे लोक शांत, संवेदनशील, सर्जनशील आणि सहकार्य करणारे असतात, ज्यांना इतरांसोबत वेळ घालवायला आवडतो; ते कठीण परिस्थितीत धीर धरतात, पण त्यांना कामासाठी सतत प्रोत्साहनाची गरज असते, असे अंकशास्त्र सांगते. त्यांचे स्वामी ग्रह चंद्र असून, ते भावनिक, बुद्धिमान आणि समतोल लोक मनाने श्रीमंत असतात. हे लोक बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी ठरतात.

  February 13, 2026


साहित्य - ललित

प्रल्हाद!

Category:

 

‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.

गोष्ट जुनीच आहे. आमच्या परळीच्या (तेव्हा परळी ‘आमची’ नाही, तर माझी होती!) एका बँकेत मी ‘पासबुक रायटर’ म्हणून टेम्पररी (आमच्या शाम्या त्याला -टेम्परवारी म्हणायचा) लागलो होतो. बँकेचा क्लर्कच्या परीक्षा झाल्या होत्या, नवीन उमेदवार पोस्ट होईपर्यंत मला काम करता येणार होते. असेन तेव्हा वीस बावीस वर्षाचा. गाव छोटस होत, येथेच मी लहानाचा मोठा झालो होतो, शाळा कॉलेज इथलंच.

  February 13, 2026


लेखसंग्रह

मूर्ख लक्षणे : ओळख आणि उपाय

Category:

 

मूर्खलक्षण समजावून समर्थांनी मूर्खांचे विविध लक्षणांचे अत्यंत सूक्ष्म वर्णन केले आहे.

  February 13, 2026


कर्मयोगी नामदेवराव व्हटकर
व्हिडिओज - Marathi

कर्मयोगी नामदेवराव व्हटकर

Category:

 

दिनांक 6 डिसेंबर ….
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.

 

  February 13, 2026


महालावणी महोत्सव भाग ४
व्हिडिओज - Marathi

महालावणी महोत्सव भाग ४

Category:

 

लावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत…

  February 13, 2026


महालावणी महोत्सव भाग ३
व्हिडिओज - Marathi

महालावणी महोत्सव भाग ३

Category:

 

लावणी महामहोत्सवात आता पाहू या मुजरा… तमाशा फडतल्या सगळ्या नृत्यांगना सुरुवातीलाच मुजरा करण्यासाठी जेव्हा एकत्रित मंचावर येत असत, तेव्हाच या तमाशात आपल्याला काय दर्जाचा अनुभव मिळणार आहे, याचा अंदाज अस्सल रसिकाला येत असे… नऊवारीत सर्वांग लपेटून, त्या नृत्यनैपुण्य दाखवत असत…रसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीबाही करायची त्यांना गरजच भासत नसे.

  February 13, 2026


एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव
व्हिडिओज - Marathi

एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव

Category:

 

लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर आज पाहूया एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत…

  February 13, 2026


महालावणी महोत्सव
व्हिडिओज - Marathi

महालावणी महोत्सव

Category:

 

मित्रहो, दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. पण प्रामुख्याने हलकीफुलकी गाणी, उपशास्त्रीय वा शास्त्रीय संगीताकडेच आयोजक आणि रसिकांचा कल असतो. आमचं लोकसंगीत दुर्लक्षित रहातं.

  February 13, 2026


दाजी पणशीकर – चित्रफित
व्हिडिओज - Marathi

दाजी पणशीकर – चित्रफित

Category:

 

ज्येष्ठ विचारवंत, ऋषितुल्य दाजी पणशीकर दिनांक ६ जून २०२५ या दिवशी अनंताच्या प्रवासाला गेले. २००८ साली त्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त टिटवाळा येथे दाजींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दाजींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी एक चित्रफित प्रकाशित करण्यात आली होती. ती पाहून त्यांच्या कार्याला वंदन करुया…

  February 13, 2026