व्यक्ती-परिचय

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि अभिनेते सलिल अंकोला

Category:

 

सलील अंकोला यांनी एक क्रिकेटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकेटच्या इनिगनंतर ते अभिनयाकडे वळले.आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सलील अंकोला यांनी सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं होतं. दुर्दैव असं की अंकोला यांच्यासाठी हा सामना कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना ठरला.

व्यक्ती-परिचय

भूमिपुत्र व जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन

Category:

 

सामाजिक कार्यामुळे लाखोंचा पोशिंदा झालेले भवरलाल जैन यांनी आपली ‘भाऊ’म्हणून ओळख निर्माण केली होती. भंवरलाल जैन यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर. आर. हायस्कूलमध्ये तर बी. कॉम, एलएल.बी. मुंबई विद्यापीठातून केले. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जेव्हा मुंबई-पुण्यापलिकडे जात नव्हती, तेव्हा भवरलाल जैन यांनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात रचला.

व्यक्ती-परिचय

भारताचे दहावे उपराष्ट्रपती  कृष्णकांत

Category:

 

कृष्णकांत हे १९९७ ते २००२ या कालखंडात भारताचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी १९८९ सालापासून १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते.

व्यक्ती-परिचय

भारताचे माजी पंतप्रधान  मोरारजी देसाई

Category:

 

मोरारजी देसाई यांचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील रणछोडजी हे प्राथमिक शिक्षक, तर आई मणिबेन ही निरक्षर होती. मोरारजींचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले. ते १५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले.

व्यक्ती-परिचय

बॉलिवूड अभिनेत्री हेजलकिच

Category:

 

हेजल किच ही मूळ ब्रिटीश बॉलिवूड अभिनेत्री आहे. हेजलचे वडील ब्रिटिश आहेत तर आई मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या कुटुंबातील आहे. हेजलने ‘हॅरी पॉटर’ या ब्रिटीश- अमेरिकन फिल्म सीरिजमध्ये काम केलंय. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बालकलाकार म्हणून हेजल ‘हॅरी पॉटर’ सीरिजच्या तीन चित्रपटांमध्ये झळकली होती.

व्यक्ती-परिचय

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

Category:

 

बिहारच्या बख्तियारपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नितीश कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण याच जिल्ह्यातील श्री गणेश हायस्कूलमध्ये झालं. नंतर त्यांनी पाटणाच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून मॅकेनिकल इंजीनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं.
नितीश कुमार ज्येष्ट स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या विद्यार्थी आंदोलनात तयार झाले.

व्यक्ती-परिचय

बालवाङ्‍मयाचे जनक  विनायक कोंडदेव ओक

Category:

 

इंग्रजी तीन इयत्तांपर्यंतच त्यांचे शिक्षण झालेले असले, तरी इंग्रजी व मराठी भाषांवर त्यांनी चांगले प्रभुत्व मिळविले होते. शिक्षणक्षेत्रात प्रथम एक शिक्षक या नात्याने शिरून पुढे ते एक शिक्षणाधिकारी झाले, १८८१ साली मुलांसाठी बालबोध या नावाचे एक मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले

व्यक्ती-परिचय

प्रसिध्द चित्रकार  प्रफुल्ला डहाणूकर

Category:

 

प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्स सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या. प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले.

व्यक्ती-परिचय

प्रा.डॉ. प्रकाश खांडगे

Category:

 

महाराष्ट्राच्या लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक अशी ओळख लाभलेले डॉ. प्रकाश खांडगे यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्र यांची लोककला आणि लोकसाहित्याशी सांगड घालण्याची अवघड कार्य प्रदीर्घ काळ तर केलेच आहे, पण अनेक तमाशा शिबिरांचे यशस्वी संचालक म्हणून पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे.

व्यक्ती-परिचय

पद्मा तळवलकर

Category:

 

पद्मा तळवलकर या माहेरच्या पद्मा सहस्रबुद्धे. पद्मा तळवलकर या जयपूर-अत्रौली घराण्याच्या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत. पद्मा तळवलकर यांचे आजोबा काणेबुवा हे कीर्तनकार होते. त्यामुळे घरात गाणे होते. गाणे शिकण्यासाठी पद्मा तळवलकरांना घरातून आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला