बांधकामाच्या वेळी घ्यावयाची काळजी
Category:
लेखसंग्रहआराखड्याप्रमाणे व्यास, परिमाणांसह सलोह काँक्रीट होत आहे की नाही हे बघणे पर्यवेक्षकावर बंधनकारक असते. सलोह काँक्रीट हे नुसत्या काँक्रीटपेक्षा अनेकपटीने मजबूत असते. प्रचंड वादळे, भूकंप यांना तोंड देऊ शकते. त्याचा वापर +५० ते -४० अंश सेल्सियस या तापमानात करता येतो. मात्र खांब, तुळया, स्लॅब याला तडे जाऊन सळ्या उघड्या पडल्यावर त्या गंजतात. त्यामुळे अशा वेळी फटी मोठ्या करून त्यावर रसायनाचा लेप देऊन त्या परत काँक्रीटने बंद कराव्यात.