लेखसंग्रह

सुभाषित रत्नांनी – भाग ३

Category:

 

या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.

लेखसंग्रह

सोडायुक्त पेय का फसफसते?

Category:

 

कोणतेही सोडायुक्त सॉफ्ट ड्रिंक फसफसते, ते का? कार्बन डाय ऑक्साइड वायू पाण्यात विरघळतो, तेव्हा त्या द्रावणाला कार्बोनिक आम्ल म्हणतात. खरं तर अशा द्रावणात कार्बोनिक आम्ल थोड्याच प्रमाणात असते. आपल्या उच्छ्वासावाटे कार्बन डाय ऑक्साइड वायू शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेतही कार्बोनिक आम्ल तयार होते. अंतराळात घन स्वरूपातील पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइड यांच्यावर वैश्विक आणि अतिनील किरणांच्या प्रभावामुळे कार्बोनिक आम्ल तयार होऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

लेखसंग्रह

शोध

Category:

 

आम्ही दोघे रात्री बारा वाजता शिडीने कौलावर चढलो व शेजारच्या वाड्यात बघू लागलो. शुभ्र चांदणे असल्यामुळे सगळे नीट दिसत होते. खणण्याचे आवाज जोरात येत होते पण बाकी काहीच दिसत नव्हते. अशी पाचेक मिनिटे गेली असतील आणि अचानक एक गाईचे पांढरे वासरू या खोलीतून त्या खोलीत जाताना दिसले. आता इतक्या रात्री वासरू तिथे येणे शक्यच नव्हते. आमच्या दोघांच्या अंगावर सरसरून काटा आला. खरे तर आमची बोबडी वळली होती.

लेखसंग्रह

पाचशे दातांचा सरीसृप

Category:

 

जर्मनीतील बव्हेरिआ प्रांतात फ्रँकोनिअन जुरा नावाचा प्रदेश आहे. हा प्रदेश टेरोसॉर आणि तत्सम अतिप्राचीन सरीसृपांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. टेरोसॉर हे सरीसृप, डायनोसॉर या सरीसृपांचे भाऊबंद होते. ते उडणारे सरीसृप म्हणून ज्ञात आहेत. त्यांना पंख होते. मात्र हे पंख पिसांपासून बनलेले नव्हते, तर ते उतींपासून बनलेले होते. जगभरच्या इतर ठिकाणांप्रमाणेच फ्रँकोनिअन जुरामध्येही टेरोसॉरच्या अनेक प्रजाती सापडल्या आहेत.

लेखसंग्रह

नकोशी !

Category:

 

स्वतःला उच्च स्थानावर नेण्याची ती किंमत असते. तुम्ही कळपाचे राहात नाही आणि कळपाची गरजही संपलेली असते. परिघाबाहेर तुम्हांला टाकून वर्तुळ स्वतःला सांधून घेत असते.

लेखसंग्रह

भोपाळ दुर्घटना

Category:

 

दोन डिसेंबर, १९८४ च्या मध्यरात्री मध्य. प्रदेशातील भोपाळ येथील ‘युनियन कार्बाइड’च्या मेथिल कारखान्यात आयसोसायनाइट ऊर्फ मिक वायू वातावरणात सुटून जो प्रचंड अपघात झाला, तो औद्योगिक क्षेत्रातील जगातला आजवरचा सर्वात मोठा अपघात असे समजले गेले.

अवर्गिकृत

मी तू पणाची….

Category:

 

मी रोजच जय जय स्वामी समर्थ आणि जय शंकर महाराज यांची मालिका बघते ऐकू येत नाही पण ओठांच्या हालचाली वरून समजून घेते. प्रसंग असा एका माणसाचे दैन्य दूर करण्यासाठी तो शंकर महाराज यांच्या कडे येतो आणि विचारतो की माझे दैन्य कधी संपणार? ते म्हणतात की मी मेल्यावर तुझे दैन्य संपेल. मी आवाक झाले. पुढे त्याचे दैन्य कसे संपते हे कळते.

लेखसंग्रह

री -क्रिएशन (पुनर्निर्मिती) !

Category:

 

रिऍलिटी शो हाच मुळात री -क्रिएशनचा आरसा असतो. जुनी गाजलेली सोलो-ड्युएट गाणी नवी मंडळी री-क्रिएट करीत असतात. आणि आपण त्या हुबेहूब “कॉपीला” (लता, किशोर ची कितवी तरी आवृत्ती) दाद देत असतो. उत्सुकतेपोटी माधुरीचा सहभाग असलेला “इंडियन आयडॉल” एपिसोड बघितला. तिलाही “चोली के पीछे ” री-क्रिएट करायला लावले. माधुरी असल्याने ते दृश्य काहीसे सुसह्य वाटले इतकेच !

लेखसंग्रह

मोटार चालवणारे आम्ल !

Category:

 

मोटारकारमधील विद्युत उपकरणे चालवण्यासाठी विद्युतधारा कोठून मिळते? मोटारकारमध्ये एक विद्युतघट (बॅटरी) असतो. त्यातून मिळणाऱ्या विद्युतधारेमुळे मोटारकार सुरू होते आणि इतर विद्युत उपकरणेही चालतात. मोटारकारमधील विद्युतघटात सल्फ्युरिक आम्ल असते. त्यात शिसे (लेड) या धातूच्या पट्ट्या अर्धवट बुडालेल्या स्थितीत उभ्या असतात. दोन्हींच्या अभिक्रियेतून विद्युतधारा निर्माण होते. यामुळेच या विद्युतघटाला ‘लेड ॲसिड बॅटरी’ आणि सल्फ्युरिक आम्लास ‘बॅटरी ॲसिड’ या नावांनी ओळखले जाते.