Year: 2022
पदर नात्यांचे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबार्बीडॉलची निर्माती रुथ हँडलर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteखेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे.
कमल शेडगे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे.
भारताचे माजी तेज गोलंदाज रमाकांत देसाई उर्फ ‘टायनी’ देसाई
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले.
गन्स ऑफ नेव्हरॉन’ हा इंग्रजी क्लासिक युद्धपट प्रदर्शित झाला
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाॲलिस्टर मॅक्लीन यांच्या ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित, जेली थॉमप्सन दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे १६० मिनिटांचा असून यात ग्रेगरी पेक, डेव्हिड निवेन, अँथनी क्वीन, अँथनी क्वेल आदी एकापेक्षा एक मातब्बर कलावंत आहेत. या चित्रपटाला ऑस्करची ६ नामांकने मिळाली होती तर २ गोल्डन ग्लोब अवॉर्डसह १ ऑस्कर मिळाले होती.
सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो. पहिली अकरा वर्षे विखे−पाटील यांच्या आग्रहामुळेच डॉ. धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पहात असत.
खगोलशास्त्राचे अभ्यासक शं. बा. दिक्षित
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site“भारतीय ज्योतिषशास्त्र” हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ होय. तो नीट समजवून घेता यावा म्हणून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ मराठी शिकले ! या ग्रंथाच्या सिद्धतेसाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले.दुर्बोध बनलेल्या अनेक विषयांचा उलगडा केला. पंचांगशोधन व तत्संबद्ध मतमतांतरे यांचा परामर्श घेतला व हे शास्त्र केवळ भारतीयांनीच सुविकसित केले हे सिद्ध केले. ‘कृत्तिका पूर्वेस उगवतात ; त्या तेथून चळत नाहीत’ या शतपथ ब्राह्मणातून घेतलेल्या वाक्यावरून त्यांनी शतपथ ब्राह्मणाचा काल इ.स.पूर्व २००० वर्षे असा ठरवला.