साहित्य - ललित

गंगा दशहरा

Category:

 

जेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे.

व्यक्ती-परिचय

अनंत हरि गद्रे

Category:

 

अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्‍यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते.

व्यक्ती-परिचय

पर्यावरण अभ्यासक डॉ. विश्वंभर चौधरी

Category:

 

लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत.

दिनविशेष

क्रिकेटपटू कपिलदेव यांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी

Category:

 

२६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या.

दिनविशेष

गोवा मुक्तीदिनाची सुरुवात

Category:

 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला , पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता.

व्यक्ती-परिचय

अनंत मराठे ऊर्फ अनंतकुमार

Category:

 

बरखा, सीता स्वयवर, जय संतोषी मा, संपूर्ण रामायण भरत मिलाप अशा दोनशेहून अधिक पौराणीक चित्रपटात कामे केली. मनोज कुमार यांच्या शहिद या चित्रपटातील राजगुरू यांची भूमिका व हमारी याद आयेगी या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका खूप गाजली होती.

व्यक्ती-परिचय

जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी

Category:

 

१९८०च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले.

साहित्य - ललित

म्हातारा न इतुका

Category:

 

१९९२ साली राॅबर्ट जेम्स वाॅलर यानं लिहिलेली, त्याच नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीची ९.५ दशलक्षची विक्री होऊन, अल्पावधीतच ‘बेस्टसेलर’ ठरली. १९९४ साली क्लींट ईस्टवुडने त्यावर चित्रपट करायचे ठरविले. ५२ दिवसांच्या शेड्युलच्या, पेपरवर्कनुसार शुटींग सुरु झाले. सर्व सहकाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने, दहा दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण झाले. २ जून १९९५ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाने १८२ दशलक्ष डाॅलर्सचा अभूतपूर्व व्यवसाय केला!!

व्यक्ती-परिचय

अनंत भगवान दीक्षित

Category:

 

वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.

व्यक्ती-परिचय

कथ्थक नृत्यांगना डॉ. टीना तांबे

Category:

 

टीना तांबे यांनी रंजना ठाकुर, डॉ सुचित्रा हरमलकर, व पंडित रामलाल यांच्या कडून कथ्थकचे शिक्षण घेतले,पुढे २००१ मध्ये मुंबईत येऊन त्यांनी गुरु उमा डोगरा यांच्या कडे शिक्षण घेतले. त्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई येथून नृत्य अलंकार शिक्षण घेतले आहे, तसेच त्यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालयतून ‘कथ्थक’ या विषयात एम ए केले आहे.