अरुण पुराणिक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteएक अभ्यासक म्हणून अरुण पुराणिक यांना आजही मुंबईतल्या सोमय्या कॉलेज, किर्ती कॉलेजमधून बोलावणी येतात. एशियाटीक लायब्ररीमध्ये त्यांची व्याख्यानं होतात. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या संग्रहातील काही गोष्टींचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. तिथे लोकं भेटतात, बोलतात. पण ते पुरेसं नाहीये. या विषयात अधिक संशोधन करणारी माणसं निर्माण झाली पाहिजे. हा सगळा संग्रह लोकांना पहाता यावा, सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळता यावा यासाठी एक स्टडी सेंटर उभारण्याचा पुराणिक यांचा विचार आहे.