आजी आजोबांचे आरोग्य – भाग २
Category:
लेखसंग्रहमोठे शहर असो वा लहान गांव, अस्वच्छतेमुळे डास सर्वत्र आढळतात. डासांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे किंवा विशिष्ट वायूमुळे डास मारून जातात किंवा खोलीच्या बाहेर जातात. कालांतराने अशा धुराचा/ वायूचा परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. त्यातून पुढे खोकला, दमा, घसा दुखणे असे आजार होऊ शकतात.