कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ३५ )

Category:

 

विजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती.

  July 29, 2022


साहित्य - ललित

रॅगदॉल

Category:

 

ठरवल्याप्रमाणे काका मॅडम बुदिमाला रॅगदे यांच्या घरी गेले. त्या मुंबईच्या प्रख्यात लोखंडवाला कॉम्प्लेक्स या अतिउच्चभ्रू वसाहतीत एका पॉश इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर, पेंट हाऊसमध्ये राहत होत्या. प्रथम कॉम्प्लेक्सच्या चौकीतून रखवालदाराने मॅडमशी संपर्क साधून खात्री केली आणि मगच काकांना आत सोडले. स्वत: बुदिमालाबाईंनीच त्यांचे स्वागत केले. त्यांचा एकंदर अवतार गंगूबाई नॉनमॅट्रिक छाप गोलमटोल, गुबगुबीत होता पण वेष मात्र अगदी अप टू डेट होता.

  July 28, 2022


साहित्य - ललित

ज्ञानदेवाचे भिंताड (आठवणींची मिसळ – भाग ५)

Category:

 

वेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू.

  July 28, 2022


अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – ३७ – दुर्गाबाई देशमुख

Category:

 

१९२३ साली काँग्रेस चे अधिवेशन त्यांच्या गावी झाले. त्यावेळी दुर्गाबाई तिथे कांग्रेस कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कडे खादी प्रदर्शनात कोणीही विना तिकीट प्रवेश करणार नाही ही जवाबदारी दिली होती. त्यांनी अगदी नेहरूंना सुद्धा तिकीट दाखवे पर्यंत सोडले नाही. त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. असहकार आंदोलन,मिठाची चळवळ अश्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला, परिणामी १९३० ते १९३३ च्या दरम्यान त्यांना ३ वेळेस कारावास भोगावा लागला. कारावासात सुद्धा त्या इतर महिलांशी संवाद साधणे, त्यांच्या शैक्षणिक भूक जगविणे, त्यांना सामाजिक जाणिव करून देणे अशी सगळी कामे करत राहिल्या.

  July 28, 2022


कथा

वेगळा भाग ११

Category:

 

प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या  दोघांमध्ये  नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला  प्रतिसाद देत असतो.

  July 28, 2022