दिनविशेष

सनदी सेवा दिवस

Category:

 

भारतीय प्रशासनाचा पोलादी कणा म्हणून सनदी अधिकारी सुप्रसिद्ध आहेत. अठरापगड भाषासमूहांच्या ह्या देशाला एकत्र बांधून ठेवणारी ही पोलादी चौकट देशाच्या स्वातंत्र्यापासूनच तिच्या कामगिरीमुळे महत्त्वाची ठरली होती. देशात घटनादत्त संरक्षण असणारी सेवा म्हणजे सनदी सेवा. तिचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, व योग्य निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी न पडता अधिकाऱ्यांनी आपले काम निष्पक्षपातीपणाने करावे, ह्यासाठी हे संरक्षण दिलेले होते.

  April 21, 2022


लेखसंग्रह

जाऊ तेथे वारी

Category:

 

सामाजिक अभिसरणाचं उत्तम माध्यम असलेली ‘वारी’ हा मानवी संस्कृतीचा एक स्थायीभाव आहे. आपल्याकडे पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण दरवर्षी ठरल्या वेळी धार्मिक स्थळांना भेट देण्याची अशी परंपरा जगात ७-८ हजार वर्षांपासून सुरू आहे… 

  April 21, 2022


कथा

हरवलेल्यांची पंढरी (कथा)

Category:

 

सिनेमात काम करायचं -मुंबई. नोकरी मिळत नाही- मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई परिक्षेत नापास झाला-मुंबई :  मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसांना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही.

  April 21, 2022


साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १

Category:

 

माझा डोळ्यांवर विश्वास बसेना! हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा… असं झालं. पिठापूर बरोबर कुरवपूर पण आणि ते सुध्धा 5 मार्चला!! मी लगेच होकार कळवून टाकला.

  April 20, 2022


लेखसंग्रह

ठाणे शहराचे स्वातंत्र्यपूर्व साहित्यिक योगदान 

Category:

 

जन्म स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी झाला आहे आणि त्यांचे साहित्यही त्याच काळात प्रसिद्ध झालेले आहे असा एक गट आणि ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला, परंतु त्यांचे साहित्य १९४७ नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर प्रकाशित झाले, हा दुसरा गट. या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताना बरीच साहित्यिक मंडळी दिवंगत झालेली आढळली. त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडायचे, इतरत्र प्रकाशित असलेले साहित्यसंदर्भ धुंडाळणे अथवा त्यांच्याशी संबंधित असणारे बुजुर्ग शोधून त्यांच्याकडून आठवणींचे कवडसे हातात येतात का त्याचा प्रयत्न करणे, हाच मार्ग शिल्लक होता.

  April 20, 2022


लेखसंग्रह

यशस्वी लोक हे नेहमीच यशस्वी का असतात

Category:

 

मायकल जॉर्डन, थॉमस एडीसन, एलनॉर रूझवेल्ट आणि हेन्री फोर्ड अशी आणि इतर यशस्वी लोक यांच्यात काय गोष्टी आहेत ज्या त्यांना जेहमीच यश मिळवून देतात. त्या गोष्टी जर आपल्याला देखील माहीत झाल्या तर आपणही त्यांच्या प्रमाणे खात्रीलायक यश मिळवू शकतो. खालील गोष्टी या त्यातलाच काही आहेत असे आपण म्हणू शकतो.

  April 20, 2022


दिनविशेष

युध्दपट ‘हकीकत’ चित्रपटाला ५८ वर्षे पूर्ण झाली

Category:

 

हा एक उत्तम आदर्श युध्दपट म्हणून गणला जातो. या चित्रपटात बलराज साहनी ( मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र ( कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद ( मेजर प्रताप सिंग), तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.

  April 20, 2022


लेखसंग्रह

माई री, मैं कासे कहूँ पीर, अपने जिया की !

Category:

 

१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ !

  April 20, 2022


व्यक्ती-परिचय

जर्मनीचा हुकूमशहा ॲ‍डॉल्फ हिटलर

Category:

 

चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला.

  April 20, 2022


दिनविशेष

गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली

Category:

 

मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.

  April 20, 2022