पेबेलॉकॉन आयलंड
Category:
अवर्गिकृतमागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची.
August 16, 2021