रिसबूड सरांचा तास !
Category:
साहित्य - ललितकोण म्हणतं शिक्षक फक्त वर्गात शिकवतात ? या वयातही रिसबूड सरांनी मला परवा तासभर शिकवलं – अभ्यासक्रम वेगळा पण पद्धत तीच ! सांगलीत सरांना फोन करून घरी भेटायला गेलो. त्याच उबदारपणे स्वागत झाले , डोळ्यातला आनंद जुनाच -वय आणि मधला काळ हिरावून नेणारा !