साहित्य - ललित

माझं “माझं” दुःख !

Category:

 

दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं.

  May 29, 2021


साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ५)

Category:

 

लेखन किंवा काव्य प्रकाराकडे वळलो नव्हतो. पण योगायोगाने व्यवसायाची व्याप्ती वाढली होती . पण माझ्या अहंपणामुळे / गर्विष्ठपणामुळे / आडमुठेपणामुळे मला व्यवसायात एक मोठ्ठा फटका बसला ..रत्नागिरी जिल्ह्याचे माझे एक मोठ्ठे कामाचे टेंडर नामंजूर झाले होते तो माझा मूर्खपणा होता. खुपच विमनस्क झालो होतो. चिंताग्रस्त झालो. पश्चाताप झाला . मग रत्नागिरीतून सरळ पावसला गेलो ..! तिथे राहिलो. त्या अत्यन्त विदारक मानसिक उद्विग्न अवस्थेत मला पहिली रचना पावसच्या स्वामी स्वरूपानंद मन्दिरातील खालील चिदंबर गुहेत सूचली. हाच टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ ठरला.

  May 29, 2021


साहित्य - ललित

दहा मिनिटं..

Category:

 

माणूस हा नेहमी सुखाच्या शोधात असतो. जरा कुठं मनासारखं घडलं नाही तर त्याची चिडचिड होते. माझंही तसंच झालं होतं. तसा मी सुखवस्तू होतो, मात्र ताणतणावाने मानसिक तोल ढळला की, मला सगळं काही सोडून हिमालयात निघून जावं, असं वाटत असे. तशी नुकतीच माझी चाळीशी उलटली होती. बायको, मुलं, फ्लॅट, नोकरी, गाडी अशा मध्यमवर्गीयाला जीवनावश्यक असलेल्या सर्व गोष्टी माझ्याकडे होत्या. फक्त मन सैरभैर झालेलं होतं…

  May 29, 2021


व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू

Category:

 

रिमा लागू यांनी अनेक मालिकांतून कामे केली त्यात खानदान , श्रीमान श्रीमती , तूतू -मैमै , दो और दो पाच , धडकन , दो हंसो का जोडा , तुझं माझं जमेना आणि हल्ली सुरु असलेली ‘ नामकरण ‘ . रिमा लागू यांनी अनेक जाहिरातीतून देखील कामे केली . एक बुद्धीमान आणि चतुरस्त्र अभिनेत्री तर त्या होत्याच परंतु आपल्या सहकारी कलाकारांना त्या गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करायच्या , त्यांनी कधी स्वतःचा मोठेपणा मिरवला नाही. त्यांना समाजकारणाची आवड होती .

  May 29, 2021


साहित्य - ललित

कोस्टल रोड

Category:

 

दिघी मार्गे श्रीवर्धन ते अलिबाग साधारण शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतर असावे पण या कोस्टल रोड वरून जाताना तीन तासात पोचण्याचा विचार न करता निघाले तर सकाळपासून संध्याकाळ झाली तरी कंटाळा येणार नाही.

  May 28, 2021


लेखसंग्रह

एकेक दिवा वाटू या !

Category:

 

आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे.

  May 28, 2021


साहित्य - ललित

सांगी’वांगी’

Category:

 

मराठी वाक्प्रचारामध्ये अनेक फळभाज्यांची नावं सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ, पुराणातील वांगी पुराणातच, वांग्याचं तेल वड्याला, सांगीवांगी, इत्यादी. आमच्या शाळेतील एक शिक्षक फार कडक होते, ते गोंधळ घालणाऱ्या मुलांना दम देताना म्हणायचे, ‘तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत तर मी एकेकाच्या पार्श्वभागाचं भाजून सोललेलं भरताचं वांग करेन..’ असा दम ऐकल्यावर त्या मुलांच्या डोळ्यापुढे, कल्पनेनं त्यांचा पार्श्वभाग दिसायचा आणि ते ‘शांत’ बसायचे.

  May 28, 2021


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ५१ – गुरुतत्व!

Category:

 

माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी…

  May 28, 2021