प्रार्थना

मनासारखे सारे आयुष्य जगावे..
हे स्वप्न अधुरे , मी नित्य पाहतो..
अंबरी घनमेघनांचे अवीट सोहळे..
लोचनी मी अलगद बांधून ठेवितो..

हृदयांतरी बिलोरी प्रतिबिंब तयांचे..
भावशब्दातुनी मीच गुंफीत जातो..
तूच हृदयस्थ ! विराजमान प्रांजला..
स्वप्नातुनी तुला गं मी नित्य पाहतो..

ओढ तुझी गं , ती अव्यक्त अनावर..
क्षणा क्षणाशी रोज तडजोड करतो..
भाग्यरेषा ! साऱ्याच मम भाळीच्या..
नित्य मनांतराला मीच समजावितो..

तूच रुपसुंदरा.. ! ईश्वरीय अमृतगंधी..
स्वप्नातुनी , आकंठ अविरत प्राशितो..
मागणे एकच आता स्वप्न सत्य व्हावे..
दान ! मी दयाघनाला सदैव प्रार्थीतो..

©️वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र.५३/ ६-४-२०२१.



मनासारखे सारे आयुष्य जगावे..
हे स्वप्न अधुरे , मी नित्य पाहतो..
अंबरी घनमेघनांचे अवीट सोहळे..
लोचनी मी अलगद बांधून ठेवितो..

हृदयांतरी बिलोरी प्रतिबिंब तयांचे..
भावशब्दातुनी मीच गुंफीत जातो..
तूच हृदयस्थ ! विराजमान प्रांजला..
स्वप्नातुनी तुला गं मी नित्य पाहतो..

ओढ तुझी गं , ती अव्यक्त अनावर..
क्षणा क्षणाशी रोज तडजोड करतो..
भाग्यरेषा ! साऱ्याच मम भाळीच्या..
नित्य मनांतराला मीच समजावितो..

तूच रुपसुंदरा.. ! ईश्वरीय अमृतगंधी..
स्वप्नातुनी , आकंठ अविरत प्राशितो..
मागणे एकच आता स्वप्न सत्य व्हावे..
दान ! मी दयाघनाला सदैव प्रार्थीतो..

©️वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र.५३/ ६-४-२०२१.

Author