ब्लॅक सी
Category:
लेखसंग्रहभूमध्य समुद्रातून इस्तंबूल ओलांडल्यावर काळ्या समुद्राला सुरवात होते. काळ्या समुद्रात भरती ओहोटी हा प्रकार नाही हे समजल्यावर नवल वाटलं. मग पावसाचं पाणी कुठे जात असेल हा प्रश्न पडला पण इस्तंबूल वरून जाता येताना नेहमी पाणी काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे वेगाने वाहताना दिसायचे.