No Picture
लेखसंग्रह

प्री सी ट्रेनिंग

Category:

 

बाबा पोलीस खात्यामध्ये थेट फौजदार म्हणून भर्ती झाले होते त्यामुळे त्यांची खाकी वर्दी आणि खांद्यावर असणारे दोन चांदीचे स्टार बघत बघत मोठे होत होतो. सहावित असतानाच बाबांचं प्रमोशन झाल्याने आणखीन एक तिसरा स्टार वाढला. पी एस आय चे इन्स्पेक्टर झाले आणि रिटायर होता होता ए सी पी झाले. त्यांच्या खाकी वर्दीला असणारा रुबाब आणि त्याहीपेक्षा असणारा दरारा इतर कुठल्याही युनिफॉर्मला अजूनपर्यंत तरी बघायला मिळाला नाही. बाबांसारखे खांद्यावर तीन तीन चंदेरी स्टार नाही मिळाले पण बाबां सारखा खाकी युनिफॉर्म आणि खांद्यावर तीन सोनेरी पट्ट्या मात्र मिळाल्या.

No Picture
लेखसंग्रह

मॅन ओव्हरबोर्ड

Category:

 

बंगालच्या उपसागरात एक मासेमारी करणारी भारतीय बोट पाण्यात बुडाली. त्या बोटीवर 15 सहकाऱ्यांसह असणारा एक भारतीय खलाशी रबिंद्र दास सुमारे पाच दिवस कशाच्या तरी आधारावर तरंगत राहिला पण 600 km खोल समुद्रात प्रवाहा सह वाहून गेला. समुद्रात पाच दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तेही वादळी हवामानात तो जिवंत राहिला होता. हवामान खराब त्यात जी बोट बुडाली होती त्यावर काम करणाऱ्या खलाशांपैकी कोणाच्या नातेवाईकांना या गोष्टीची कल्पना होती की नव्हती कोणास ठाऊक.

No Picture
व्यक्ती-परिचय

डॉ श्रीकांत जिचकार…. वकिल, डॉक्टर ,आयपीएस, आयएएस +++

Category:

 

एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.

No Picture
लेखसंग्रह

भुलभुलैय्या…. वास्तुशास्त्राची कमाल

Category:

 

आजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत… सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त.