लेखसंग्रह

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी…

Category:

 

सध्याच्या फास्ट लाइफमध्ये बऱ्याच जणांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे, पण ह्याचे जर मूळ कारण शोधले तर बऱ्याचदा आपल्या चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या पद्धतीमुळे पोटाच्या समस्या ह्या जास्त प्रमाणात होतात. जर ह्यावर यशस्वीरीत्या मात कराची असेल तर प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. परंतु, म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात करण्याच्या काही गोष्टी….

  March 17, 2019


साहित्य - ललित

जाब

Category:

 

“ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू” तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता.

  March 17, 2019


व्यक्ती-परिचय

ख्यातनाम लेखिका सरोजिनी शारंगपाणी

Category:

 

“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…  

  March 16, 2019


साहित्य - ललित

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – अ

Category:

 

आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.  आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं.

  March 16, 2019