साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग १८

Category:

 

रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेलतर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! बुटक्याच्या बॉडी बरोबर जर त्याचा मोबाईल हाती लागलातर, राघव कॉल हिस्ट्रीवरून रुद्रापर्यंत पोहचू शकत होता! काल स्पाय कॅमेऱ्या सोबत दोन लाखाची रोकड हि मिळाली होती! मुंबईत थांबणे धोकादायक होते. सारासार विचार करून रुद्राने रत्नागिरीचे तिकीट तत्काल मध्ये बुक केले होते.

साहित्य - ललित

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग १

Category:

 

लोकसत्ताच्या दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील गुलजार यांचा लेख सुंदर आहे, पण तो ललित लेख स्वरूपाचा आहे. हा लेख म्हणजे गुलजार यांच्या गालिब समजून घेण्याचा पुन:प्रारंभ आहे, असें लोकसत्ता म्हणताहे. तेव्हां पुढील लेखांची वाट पहावी लागेल. मात्र हेंही खरें की प्रस्तुतचा लेख वाचून बराचसा अपेक्षाभंग झाला. गुलजार यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही असें म्हणावेसें वाटतें की, ‘मिर्झा गालिब’ ही आपली टी. व्ही. मालिका काढायच्या वेळीं गुलजार यांनी जी पटकथा, स्क्रिप्ट लिहिलें असणार, त्या ‘पोतडीतून’ हा ललित लेख बाहेर काढलेला आहे.

लेखसंग्रह

शेअर मार्केटशी मैत्री

Category:

 

शेअर मार्केट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी स्वतः गेली २५ वर्षे शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करीत आहे. मी काही तज्ञ नव्हे तर माझ्या अनुभवातून काही गोष्टी शिकलो त्यामुळेच हा विषय सोप्या मराठी भाषेत मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न करतोय……..

लेखसंग्रह

वारंवार केसगळती होत असेल तर करा ही ‘५’ योगासने!

Category:

 

केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते.

साहित्य - ललित

मुक्ती दूत

Category:

 

मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती.

लेखसंग्रह

राष्ट्रीय कॅलेंडर आणि इंग्रजी कॅलेंडर

Category:

 

राष्ट्रीय आणि इंग्रजी ही दोन्ही कॅलेंडर सूर्यावर आधारित आहेत. त्यामुळे त्यात १२ महिने आणि ३६५ दिवस आहेत. प्रत्येक दिवस हा तारखेने दर्शविला जातो आणि तारीख मध्यरात्री बदलते. ऋतूंशी मेळ रहावा म्हणून यामध्ये ४ वर्षातून १ दिवस जास्त घ्यावा लागतो. त्यामुळे या शृंखलेतील चौथे वर्ष हे ३६६ दिवसांचे असते. या कारणामुळे इंग्रजी कॅलेंडर सुटसुटीत आहे. वरील सर्व गोष्टी राष्ट्रीय कॅलेंडरलाही लागू असल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडर ही वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आहे. राष्ट्रीय कॅलेंडरचा वेगळेपणा आता पाहू.

अनंत आत्माराम काणेकर
व्यक्ती-परिचय

अनंत आत्माराम काणेकर

Category:

 

मराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत आपलं लेखन पोहोचवलं. “चित्रा” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून ही अनंत काणेकरांनी काम पाहिलं.