वेडा घुम्या !
Category:
साहित्य - ललितलहानपणा पासून मी कमी बोलणारा आणि एक्कलकोंडा आहे. लोक माझी खिल्ली उडवतात मला पाहून खिदी -खिदी हसतात. मला वाईट वाटत. मग मी त्यांच्या पासून दूरच रहातो. माझ्या अश्या वागण्याने घरचे लोक मला ‘घुम्या’ म्हणू लागले , मग बाहेरचे पण याच नावाने बोलावू लागले! आज माझी हीच ओळख आहे. घुम्या !!