श्री स्वामी नामाचे माहात्म्य !
Category:
लेखसंग्रहअक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुदंर आहे. स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधा भोळा प्रांपचिक भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते. दु:खित, पिडीत, मुमुक्षू जिवांना आधार देऊन दु:ख मुक्त करणारे दीनजनउध्दारक स्वामी महाराज हे केवळ शुध्द भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अतिप्रसन्न होतात.