लेखसंग्रह

प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश सध्या विचाराधिन

Category:

 

प्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण असंख्य जवान हे खेड्यापाड्यातील असल्याने ते महिला कमांडरचे आदेश पाळतीलच याची खात्री देता येत नाही, असे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये व्यक्त केले.

साहित्य - ललित

जोहार मायबाप जोहार

Category:

 

सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. ज्ञानोबा आला म्हटल्यावर हजारो माणसं भराभर कीर्तनाच्या जागी जमली …. चोखोबा सुद्धा न राहवून अगदी पुढे जाऊन बसला …. कीर्तन सुरू झालं … चंद्रभागेच्या पाण्यासारखा ज्ञानदेवांचा आवाज ऐकून चोख्याला रडूच फुटायचं…. तो लहान असतानाच त्याची माय गेली …. पण त्याच्या आठवणीत ती नेहेमीच असायची…

लेखसंग्रह

नागराज

Category:

 

खरं तर आपल्या संस्कृतीचं असं कुठलंच क्षेत्र नाही, जे नागाच्या धारणेनं व्यापलेलं नाही. परंपरेने याला पृथ्वीला मस्तकी धारण करणारा सर्वश्रेष्ठ शेष म्हटलेला आहे. समुद्रमंथनात तर वासुकी नागाची दोरी देव-दानवांनी धरली होती. वास्तुपूजनाच्या विविध विधीत ज्या दहा जणांना बळी अर्पण करण्याची प्रथा होती. त्यात एक बळी वासुकी नागासाठी आहे.

लेखसंग्रह

पुराणपुरुष

Category:

 

जंगलातल्या मोकळ्या माळावर चरणांरा ‘रानगवा’ एवढ्या बेफिकिरीत वावरत असतो, की तो जणु काही त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राटच आहे. त्याची ताकदच तशी प्रचंड असते. शरिराचा विलक्षण सुंदर घाट आणि पिळदार स्नायू यामुळे तो दिसतोही उत्तम शरीर कमावलेल्या पैलवानासारखा. व्यायामानं जसं पैलवानाचं शरीर चमकत असतं तशीच त्याची त्वचाही चमकत असते. त्याचं ते ‘बेरड’ रूपंच सगळ्या जंगलविश्वाला टरकावत असतं.

लेखसंग्रह

पुष्पक विमान – कर्नुल परिसर – आंध्र प्रदेश

Category:

 

हे निसर्ग निर्मित पुष्पक विमान इथे गेली शेकडो हजारो वर्ष आहे …. दक्खनच्या पठारावर किती पावसाळे … वादळं आली आणि गेली. पण हे नैसर्गिक पाषाणशिल्प मात्र आहे तसंच आहे … इकडे येणाऱ्या प्रवाश्यांची नजर गेली आणि त्यांना या पाषाणशिल्पातलं दैवी अप्रूप दिसलं तर मात्र ते दिग्मूढ होऊन जातात

साहित्य - ललित

मसुरे …. पाचूचा सुंदर गाव

Category:

 

मसुरा आहे साधारण मध्यभागी …… म्हणजे कणकवली आणि मालवण पासून साधारण सारख्या अंतरावर …. गाव एकदम हिरवागार ……तेजस्वी पाचूसारखा …. घनदाट अरण्याचं कोंदण असलेला …लालमातीच्या देखण्या टेकड्यांचा …. त्यावरच्या काजूच्या बागांचा … गर्द आमरायांचा …. आणि त्यात वसलेल्या साध्या पण सुंदर घरांचा …. एक एक घर बघत राहावं असं …. सांडलेलं तेल टिपून घ्यावं … असं स्वच्छ अंगण आणि त्यात मनाला प्रसन्न करेल असं तुळशीवृंदावन …

लेखसंग्रह

महेश्वरची महाश्वेता… अहिल्याबाई होळकर

Category:

 

प्रत्येक मराठी मनात ‘माळव्या’ बद्दल एक वेगळीच जवळीक आणि हळवं आकर्षण आहे. इंदूर … धार … देवास … मांडू .. जीवनदात्री…गूढरम्य नर्मदा …. ही आकर्षणं तर मराठी मनात खूप आहेतंच पण अजून मोठं आकर्षण म्हणजे नर्मदेच्या तीरावरचं महेश्वर आणि अहिल्याबाई होळकर.

साहित्य - ललित

माझी पहिली चित्रपट कथा

Category:

 

रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ’ पद्धतीनी काढली गेली असावी!

साहित्य - ललित

सर्वसाधारण हॉटेलनीती

Category:

 

चौघांच कुटुंब हाँटेलमधे प्रवेश करताच आपल्या ओळखीच कोणी नाही न किंवा आहे का हे कनफर्म करत एसी किंवा फँनच्या टप्प्यात, खिडकीपासुन जवळ, कोपर्यातली जागा पटकवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबाची इतरांकडे पाठ पण आपल्यासाठी टेहेळणी बुरुजावरुन हाँटेलमधील उपस्थित व प्रवेश द्वारातुन येणार्या जाणार्या सौंदर्य स्थळांची नोंद घेता येइल अशी बैठक कुटुंबप्रमुख आदर्श मानतो आणि साकारतो.

साहित्य - ललित

स्वर्गातही सोशल मिडीया साकारणार

Category:

 

पृथ्वीवरच्या सोशल मिडियाची खबर काही चुगलखोर आत्म्यांनी स्वर्गात पोहोचवली. एक दोन, ए ग्रेड अप्सरांनी नारदाच्या मदतीने लगेच इंद्राचे कान भरले. मानव निर्मित सोई सुविधांचे अनुकरण देवाधिकांनी करण्याविषयी इंद्राच्या मनात थोडी चलबिचल झालीही परंतु, ” स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा दरबारात इफेक्टीव्ह कम्युनिकेशन टुल म्हणून वापर करुन आपण सर्व अप्सरांच्या हलचालींवरही लक्ष ठेउ व सतत सर्वाच्या टचमधे राहू शकु ” या स्वार्थी हेतूने इंद्रानी स्वर्गातल्या सोशल मीडियाला तत्वत: होकार दिला आणि सर्व अप्सरांची मीटिंग बोलावली.