व्यक्ती-परिचय

मराठमोळा मोहक चेहरा – स्पृहा जोशी

Category:

 

स्पृहा जितकी परखड आहे तितकीच मदत करणारीसुद्धा! एका व्यावसायिक शूटच्या वेळी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन स्पृहाला चक्क दहा वेगवेगळे पेहराव करावे लागले होते, ते तिने कोणतीही तक्रार न करता केले. हिंदुस्थानी सणांवर हे शूट बेतलं होतं. वेगवेगळे हिंदुस्थानी सण आणि एकच चेहरा अशी थीम होती. कल्पना सुरेख असली तरीही ती तडीस नेणं हे तसं कठीण होतं. आपल्या चेहऱयावर एकाच दिवशी दहा प्रयोग होणार होते. त्यातून आपली वेगळी प्रतिमा जगासमोर येणार होती. या सर्वांचा अभ्यास करूनच स्पृहाने या शूटला होकार दिला असावा.

  December 19, 2018


साहित्य - ललित

फरिश्ता !

Category:

 

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें.

  December 19, 2018


लेखसंग्रह

प्रामाणिकपणा

Category:

 

लहानपणी लाकूड तोड्याची गोष्ट प्रामाणिकपणा चे महत्त्व मनावर ठसवण्यासाठी सांगितली  जात असे. आज तशीच घटना परत घडली तर आजचा लाकूडतोड्या  कसा वागेल आणि देवाकडे काय मागेल? तुम्हाला काय वाटते?

  December 19, 2018


लेखसंग्रह

भारताची सागरी सुरक्षा – भाग २

Category:

 

संपूर्ण किनारपट्टीची फटिविरहित देखरेख पुरवण्यासाठी, तसेच अशोधित जहाजांचा प्रवेश रोखण्यासाठी, भारत सरकारने ’किनारी देखरेख महाजाल प्रकल्प’ (कोस्टल सर्वेयलन्स नेटवर्क प्रोजेक्ट) सुरू केलेला आहे. ह्या महाजालात किनारी रडार साखळी, ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आणि व्ही.टी.एम.एस. यांचा समावेश होतो. प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात, भारतीय किनारपट्टीवर ४६ स्थिर रडारपैकी मुख्य भूमीवर ३६ आणि द्विपभूमी प्रदेशांवर १० बसवली आहे.

  December 19, 2018