संस्कारमय मन

प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा
उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१,

मनी आस ती राहत असते, उचलून त्यास घ्यावे
शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे...२,

प्रयत्नात त्या साथ न मिळता, खालती कोसळते
विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३,

विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे
निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे...४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा
उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१,

मनी आस ती राहत असते, उचलून त्यास घ्यावे
शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे…२,

प्रयत्नात त्या साथ न मिळता, खालती कोसळते
विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३,

विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे
निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे…४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author