Sanja Poli-300
खाद्ययात्रा

सांज्याची पोळी

Category:

 

अर्धी वाटी तूप घालून दोन वाट्या रवा चांगला भाजून घ्यावा. दुसऱ्या पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर दोन वाट्या चिरलेला गूळ घालून तो विरघळल्यावर त्यात वेलची पूड व भाजलेला रवा घालून शिऱ्याप्रमाणे शिजवून घ्यावे. हा सांजा भरून पुरणपोळीप्रमाणे पोळी बनवावी. वरून साजूक तूप घालुन खायला द्यावी.

Khava-Poli-300
खाद्ययात्रा

खव्याची पोळी

Category:

 

थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.

Masaale-Bhaat-300
खाद्ययात्रा

मसालेभात

Category:

 

तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवणे. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहोरी, हळद, काजू घालून तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतताना दुसर्या गॅसवर २ कप पाणी गरम करत ठेवावे. तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.