मुळव्याध – अवघड जागेचे दुखणे
Category:
लेखसंग्रहमूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.