आजचा विषय पुडिंग भाग दोन
Category:
खाद्ययात्राजेलीचे एक पाकीट घेऊन त्यावरील सूचनेप्रमाणे जेली बनवावी व फ्रिजमध्ये अर्धवट सेट झाली की त्यात फळांचे काप मिसळून पुन्हा सेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवावी. अर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड बनवून गार करून घ्यावे. सेट झालेल्या जेलीवर या गार कस्टर्डचा थर द्यावा. पुन्हा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून नंतर त्यावर क्रीम पसरून घालावे. नंतर सुक्या चेरीज, डाळिंबाचे दाणे, काजू – बदामाचे काप यापैकी कशानेही आवडीप्रमाणे सजावट करावी.