फेब्रुवारी ०९ : ग्लेन मॅग्राचा जन्म
Category:
लेखसंग्रहजगातील सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाजांपैकी एक आणि ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिक सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाज (ठसन असलीच तर डेनिस लिलीचीच) अशी मॅग्राची सार्थ ख्याती आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जे जबरदस्त वर्चस्व राखले त्यात ह्या कबुतराच्या गोलंदाजीचा सलामीचा आणि सिंहाचा वाटा होता.