चिऊताईचं घर शोधून द्याल का?
Category:
अवर्गिकृतजंगले आणि झाडे तोडून सर्वत्र सिमेंटच्या जंगलांचे साम्राज्य पसरत चालले आहे. याचे दुष्परिणाम सर्वच प्रकारच्या प्रदूषणात होऊ घातले आहेत. त्यात काही पक्षी आणि प्राणी लुप्त होऊ लागले आहेत. चिमणी, घुबड, रानपिंगळा, कबुतर असे पक्षी काही दिवसांनी फक्त पुस्तकातून आणि चित्रांतून दिसतील. २० मार्च हा दरवर्षी जागतिक चिमणी दिन पळण्यात येतो या निमित्ताने चिमण्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे.