अवर्गिकृत

कर(नाटकी) राजकारणाचा नवा अध्याय

Category:

 

कर्नाटकमध्ये सध्या राजकारण्यांची ‘कामे कमी आणि नाटके जास्त’ अशी परिस्थिती झाली आहे. तिथे नव्या नाटकाचा प्रारंभ झाला असून एकूण राजकीय परिस्थिती कूस पालटत आहे. या राज्यातील राजकीय ध्रुवीकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असला तरी तिथली जनता राजकारण्यांना विटून गेली आहे. येथील राजकारणात गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये घडलेले बदल तपासून पाहिले तर नाट्यमय राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे दिसून येते.

लेखसंग्रह

ऑक्टोबर १२ – विजय मर्चंट आणि २ दिवसांची कसोटी

Category:

 

एका विजय दहियाचा अपवाद वगळता नावात ‘विजय’ असलेल्या इतर सर्व जणांनी कसोट्यांमध्ये भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर आणि अगदी आत्त्ताच्या मुरली विजयची सुरुवातही आश्वासक आहे. अवघ्या दुसर्‍याच दिवशी संपलेली एक कसोटी १२ ऑक्टोबर २००२ रोजी शारजात सुरू झाली.

ऑक्टोबर १३ सर्पट्याचा शोधक आणि विविअन रिचर्ड्सचा तडाखा
लेखसंग्रह

ऑक्टोबर १३ सर्पट्याचा शोधक आणि विविअन रिचर्ड्सचा तडाखा

Category:

 

’सर्पट्या’ चेंडूच्या (गुगली) शोधाचे श्रेय ज्याला दिले जाते त्या बर्नार्ड जेम्स टिन्डल बोसांकेचा जन्म १३ ऑक्टोबर १८७७ रोजी मिडलसेक्समध्ये झाला (इंग्लंड).

ऑक्टोबर १४ रशीद लतीफ आणि ‘गंभीर’ गौतम
लेखसंग्रह

ऑक्टोबर १४ रशीद लतीफ आणि ‘गंभीर’ गौतम

Category:

 

१४ ऑक्टोबर १९६८ रोजी रशिद लतिफ या पाकिस्तानी कर्णधाराचा आणि यष्टीरक्षकाचा जन्म झाला. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणार्‍या निकालनिश्चिती प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार मान्य करणार्‍या थोडक्या खेळाडूंमध्ये रशीद लतीफ होता.

लेखसंग्रह

ऑक्टोबर १८ झिम्मींची पहिली कसोटी आणि आरंभशूर नरेंद्र

Category:

 

१९६८ : दणदणीत पदार्पण, खणखणीत पुनरागमन आणि चटपटीत अपयश अशा विचित्र रंगांची कारकीर्द लाभलेल्या नरेंद्र दीपचंद हिरवानीचा जन्म. स्थळ गोरखपूर, उत्तर प्रदेश. त्याच्याइतके झक्कास पदार्पण लाभायला भाग्यच हवे.

अवर्गिकृत

तंत्रयुगातही जुने तेच सोने !

Category:

 

तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असताना आज प्रगत वाटणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उद्याच जुनी होतात. नवी आणखी प्रगत उत्पादने त्यांची जागा घेण्यास टपलेली असतात. या जीवघेण्या स्पर्धेतही काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनेक वर्षे लोकप्रियता राखून आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांचा मागोवा.

अवर्गिकृत

महिलांचा सन्मान पुराणातच ?

Category:

 

समाजात स्त्रियांचा सन्मान केला जावा असे कितीही सांगितले जात असले तरीही आपल्या देशात अजून तरी या बाबतीत मध्ययुगीन मानसिकताच दिसत आहे. परवा एकाच दिवशी देशातील विविध न्यायालयांनी बलात्कार आणि खुनाच्या तीन बहुचर्चित गुन्ह्यांमध्ये काही आरोपींना शिक्षा सुनावली तर काहींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. देवीचे रूप मानली गेलेली स्त्री खरोखरच किती सुरक्षित आहे याचा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला वेध.

अवर्गिकृत

सुरक्षित गुंतवणुकीसाठी…

Category:

 

गुंतवणुकीवर अधिकाधिक परतावा मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळतो, परंतु त्यात धोकेही असतात. म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि काही तरुण मंडळीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशाच काही सुरक्षित गुंतवणूक प्रकारांचा मागोवा.

अवर्गिकृत

दूधाच्या भेसळीला राजकीय पाठबळ

Category:

 

वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता वाढत्या भेसळीचा सामना करावा लागत आहे. त्यात जीवनावश्यक वस्तू तसेच खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात दूधभेसळीचे मोठे रॅकेट नुकतेच उघडकीस आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा रॅकेटमध्ये सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे दूरच राहिले. अशा गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त लाभत आहे.