पंतप्रधान आले अन् गेले!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहा लेख तुमच्या हातात पडेपर्यंत पंतप्रधानांचा विदर्भ दौरा आटोपला असेल, या दौऱ्याची फलश्रुती तुमच्या समोर असेल; परंतु हा लेख लिहीत असताना पंतप्रधानांचा दौरा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याने विदर्भाला काय मिळेल, ते कितपत परिणामकारक ठरेल याचा इथे केवळ अंदाज करणे शक्य आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंतप्रधानांना कुठेतरी अस्वस्थ करून गेल्या आणि म्हणूनच त्यांनी इथल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा, इथल्या लोकांच्या समस्या थेट त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा निर्णय घेतला यात शंका नाही.