साहित्य - ललित

पुणं बदलतंय !

Category:

 

पुणं हे शहर मराठी माणसाच्या दृष्टीनं औत्सुक्याचं शहर ठरलं आहे. माणूस मग तो पुण्याचा असो वा नागपूर-नाशिकचा, पुण्याबद्दल त्याचं स्वतचं असं ठाम मत असतं. तो नागपूरचा असेल, तर त्याला या गावाचा हेवा वाटतो. नाशिकचा असेल, तर पुण्याला स्थायिक व्हावं असं वाटत असतं. पुण्यातल्या माणसाला, मग तो मूळ पुण्याचा असो वा नसो अपार असं कौतुक असतं.

  February 10, 2006


साहित्य - ललित

माझ्या मनातले…

Category:

 

ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्‍याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली.

  February 9, 2006


लेखसंग्रह

राज्य विकायचे आहे!

Category:

 

लोकशाही व्यवस्थेत सरकारचे काम विश्वस्तांचे असते. राज्याचे खरे मालक राज्याचे नागरिक असतात या नागरिकांच्या वतीने सरकार राज्याचा कारभार पाहत असते. त्यामुळे सरकारची जबाबदारी केवळ संरक्षण आणि संवर्धनापुरतीच मर्यादित आहे; परंतु आपल्या या मर्यादेचा सरकारला विसर पडला की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.

  February 5, 2006


लेखसंग्रह

शेतकरी; बंदुका आणि शरद जोशी

Category:

 

शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकऱ्यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा पुन्हा एकदा अक्षरश: बाजार मांडला आहे. त्यांचे कोणतेही आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी कधीच नव्हते आणि म्हणूनच त्यांच्या कोणत्याही आंदोलनातून शेतकऱ्यांचे हित साधल्या गेले नाही. ऐन निर्णायक क्षणी पेटलेले आंदोलन मागे घेऊन त्यांनी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला.

  January 29, 2006


लेखसंग्रह

यथा प्रजा तथा राजा!

Category:

 

र्ीपूर्वीच्या काळात एखाद्या राज्याची ओळख त्या राज्याच्या राजावरून ठरायची. राजा नीातिवान, धर्मपरायण असेल तर प्रजाही नीतिवान, धर्मपरायण असायची आणि तशीच त्या राज्याची ओळख असायची. राज्य कसे आहे, हे राजा कसा आहे यावरून ठरायचे.

  January 15, 2006


लेखसंग्रह

भाव उत्पादनखर्चावर की…?

Category:

 

भारतीय अर्थव्यवस्था सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. आधुनिक विकासाचे स्वप्न भारताला खुणावत आहे त्या स्वप्नाकडे आपली दमदार वाटचाल सुरू आहे. भावी महासत्ता म्हणून भारताला आता ओळखले जात आहे.

  January 8, 2006


लेखसंग्रह

गृहरक्षक दलाचा सन्मान जपा!

Category:

 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विषण्ण झालेल्या आर. आर. पाटलांनी या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार गृहरक्षक दलाची मदत घेण्याच्या विचारात असल्याचे विधान नुकतेच केले.

  January 1, 2006