आत्मविश्वास

तुझ्या दुःखी मनाने वेचले
असतील अनेक अश्रू..
प्राक्तनांच्या रेघांचे ओरखडे
उठले असतील..
तू स्वतःच त्यांचे चरे पाडशील ..
दुःखाच्या तळ्यात उडी मारशील..
घनघोर काळोख्या रात्री तू मिट्ट काळोखात
दरीच्या टोकावर बसलेला..
निरव शांततेत एक दिर्घ श्वास घेतलेला..
समोर आले ते स्विकारणारा तुझ्यामधील
तू .. स्वतःमधील चैतन्य विचाराने जागृत
ठेवणारा..उजळत जावा दिवा मालवण्याआधी..
असंख्य ठिपके जोडून रेखाटली कलाकृती ..
त्या ठिपक्यांमध्ये तुझे अस्तित्व उरले तर
तयार होईल सुंदर ठिपक्यांची रांगोळी..
त्यात भाव रंग भरशील..
दाटलेल्या मेघातून उनं पावसाच्या
कणाकणातून तुझी किरणे समन्वय
करतील तेव्हाच उमटेल विशाल असे
इंद्रधनु पटलावर..
शंकाकुशंका चे जाळे दूर फेकून देत
चालत रहा वजीरासारखं ...आत्मविश्वास
तुला शिकवले मात कशी आणि कोठे
करायची जीवनाच्या पटावर.



तुझ्या दुःखी मनाने वेचले
असतील अनेक अश्रू..
प्राक्तनांच्या रेघांचे ओरखडे
उठले असतील..
तू स्वतःच त्यांचे चरे पाडशील ..
दुःखाच्या तळ्यात उडी मारशील..
घनघोर काळोख्या रात्री तू मिट्ट काळोखात
दरीच्या टोकावर बसलेला..
निरव शांततेत एक दिर्घ श्वास घेतलेला..
समोर आले ते स्विकारणारा तुझ्यामधील
तू .. स्वतःमधील चैतन्य विचाराने जागृत
ठेवणारा..उजळत जावा दिवा मालवण्याआधी..
असंख्य ठिपके जोडून रेखाटली कलाकृती ..
त्या ठिपक्यांमध्ये तुझे अस्तित्व उरले तर
तयार होईल सुंदर ठिपक्यांची रांगोळी..
त्यात भाव रंग भरशील..
दाटलेल्या मेघातून उनं पावसाच्या
कणाकणातून तुझी किरणे समन्वय
करतील तेव्हाच उमटेल विशाल असे
इंद्रधनु पटलावर..
शंकाकुशंका चे जाळे दूर फेकून देत
चालत रहा वजीरासारखं …आत्मविश्वास
तुला शिकवले मात कशी आणि कोठे
करायची जीवनाच्या पटावर.

Author