नॉस्टॅल्जिया

सुगीचे दिवस

Category:

 

नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.

  May 11, 2024


लेखसंग्रह

सार्वजनिक ग्रंथालय – वाचक – वाचन – संस्कृती

Category:

 

आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे.

  May 11, 2024


लेखसंग्रह

रामभाऊ म्हाळगी – खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी

Category:

 

निवडणुकीच्या वेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी निवडून आलेला प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने सर्व जनतेचा असतो त्याप्रमाणे रामभाऊ म्हाळगी हे जनतेचे लोकप्रतिनिधी होते. आणि जनता त्यांना आपला लोकप्रतिनिधी मानत होते. केवळ याच कारणासाठी आजही ठाणे लोकसभा क्षेत्रातील जनता तसेच रामभाऊंशी ज्याचा ज्याचा संबंध आला ते आजही त्यांना विसरु शकत नाहीत. रामभाऊंकडे आलेली कामे कुणाची आहेत.

  May 10, 2024


लेखसंग्रह

स्वच्छता

Category:

 

स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.

  May 10, 2024


साहित्य - ललित

साक्षात्कार

Category:

 

अठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला.

  May 10, 2024


लेखसंग्रह

यात्रा छप्पन्न काशी विनायकांची

Category:

 

प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काशीक्षेत्र त्याला मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, अन्न-पाणी, आसरा, भक्ती, ज्ञान देत राहील आणि अंतःसमयी त्याला मोक्ष प्राप्त करुन देईल, असे म्हटले जाते. काशीक्षेत्राचे महत्त्व सांगणारे असे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ आहेत.

  May 9, 2024