लेखसंग्रह

श्री अंबिका योग कुटीर ठाणे – एक सेवाव्रती संस्था

Category:

 

ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे.

कथा

कॅथेटर (कथा)

Category:

 

‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’
नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर मारून आणायचा. तेवढाच त्यांना विरंगुळा. बाकी सर्व बेडवरच होते. बाबू नावाचा माणूस खास सेवेसाठी ठेवलेला होता. सकाळी सात ते संध्याकाळी सात तो सेवा द्यायचा.

Whatsaap status बद्दल काही
लेखसंग्रह

Whatsaap status बद्दल काही

Category:

 

या जगातला प्रत्येक व्यक्ती व्हॉटसअप स्टेटस स्वतःच्या पद्धतीने वापरत असतो.  जसे एखादा नाराज असलेला व्यक्ती आपले दुःख त्याला कोणाला सांगायचे असेल तर तो इंटरनेट वर जाऊन त्याचा दुःखाचा संबंधित फोटोज् स्टेटस वर टाकतो. त्यातून त्या व्यक्ती अनेक अर्थ त्याचा ओळखीच्यांना सांगायचे असतात.  त्यात अनेक प्रकार आहेत. जसे कोणाचे प्रेम संबंध मध्ये भांडण झाले असेल तर त्याचा लगेच आजकल चे मुल मुली व्हॉटसअप स्टेटस वर त्या संबंधित लिहितात किंवा नाराजीचा emoji टाकतात.

लेखसंग्रह

रूपगंध बकुळ वृक्ष

Category:

 

हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. दरवळ म्हंटल की, फुलांचा असं एक समीकरण आहे. फुलांचे अनेकविध प्रकार आणि मनात भरून टाकणारे त्यांचे सुवास. प्रत्येक फुलाचा वास वेगळा आणि रुबाब त्याहून वेगळा. सुगंधाची उधळण करणारी अशी कित्येक फुलं आहेत परंतु मूकपणा जवळ बाळगणारी अशी ही बकुळच.

साहित्य - ललित

पतंग

Category:

 

संक्रांतीचा दिवस असतो. एक आई आणि तिचा लहान मुलगा घराच्या गच्चीवर पतंग उडवायला जातात. आईने मुलासाठी छान रंगीत पतंग आणलेला असतो. मांजा बांधून आई आणि मुलगा पतंग उडवायला लागतात.

साहित्य - ललित

शेवंती

Category:

 

एक पती पत्नी कायद्याने विभक्त झाले होते. आता त्यांचे रहाते घर त्यांच्या कामाचे नव्हते. ती तिच्या आई बाबांकडे निघून गेली. याला ते घर विकून दुसरे घर घ्यायचे होते. त्या घरातल्या आठवणी त्याला पुसून टाकायच्या होत्या.

साहित्य - ललित

हसत-लिखित

Category:

 

सुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती.

लेखसंग्रह

योगासने व प्राणायाम

Category:

 

अनेक ढोबळ मानाने त्यांचे पाश्चात्य व पौर्वात्य असे दोन भाग पाडता येतील. तेव्हा अगोदर व्यायाम म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेऊ. व्यायाम म्हणजे शरीराची व शरीरातील प्राणशक्तीची ओढाताण करणे किंवा शरीर शक्तीशी झुंज देणे. आयाम म्हणजे शरीर शक्ती व प्राण शक्ती यांना योग्य तऱ्हेने व योग्य दिशेने आणणे, विस्तृत करणे, संचित करणे अथवा थोपवून धरणे, बांध घालणे आणि त्याचा निरोध करणे.