कथा

मार्क ट्वेनची चरित्र कथा

Category:

 

त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे. त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते. त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती. काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे. अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली. त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले. त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही. त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे.

  July 20, 2022


साहित्य - ललित

कावळे (कथा) – भाग 3

Category:

 

ठरल्याप्रमाणे मी खाँसाहेबांच्या टीम बरोबर गोव्याला गेलो. त्या समारंभासाठी खाँसाहेबांनी माझ्यासाठी अन्वरसारखाच सुंदर जोधपुरी ड्रेस घेतला होता. विमानतळावर उतरल्यापासून आमचा ताबा ‘पंचरंग’च्या गोवा शाखेने घेतला होता.

आणि इथेच, माझा वासंतीशी परिचय झाला. पाहता क्षणीच माझ्या मनीची राजकुमारी, हीच असे मला वाटले. अत्यंत तरतरीत, बोलके डोळे, गोरीपान, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे होते. गोव्याच्या सर्व व्यवस्थापनाचे काम तिच्याकडेच होते. संपूर्ण कार्यक्रमात खाँसाहेबांच्या आग्रहानुसार माझ्याकडे खास लक्ष पुरविऱ्यात येत होते. मला अगदी लाजल्यासारखे झाले पण त्यामुळे एक मात्र झाले वासंतीचा सहवास मला पदोपदी मिळत होता. खाँसाहेबां

  July 19, 2022


लेखसंग्रह

राशोमान – सत्य असत्याचा विलक्षण खेळ

Category:

 

राशोमान हा केवळ चित्रपट नाही. तो एक आरसा आहे. माणसाच्या स्वार्थी विचारांचा, आचरणाचा व दुट्टपीपणाचा.

  July 19, 2022


साहित्य - ललित

बाबल्याची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ १)

Category:

 

अलिकडे धाकट्या बहिणीकडे कोकणात गेलो असताना, ती मला म्हणाली,”कुणास ठाऊक ! पण मला वाटते की आपल्या आईने बाबल्याला आपल्याकडे ठेऊन घेतलं असतं तर कदाचित् तो असा ठार वेडा झालाही नसता.” “माझ्या मनात हा विचार कधी आला नव्हता” असं म्हणून मी तो विषय तिथेच संपवला.पण बाबल्याचा विचार असा मनातून संपला नाही.बाबल्याचा विषय हा न संपणारा विषय आहे.न सुटणारे कोडे आहे.हे सर्व असं कां झालं? घडलं त्यापेक्षा वेगळं कांही घडणं शक्य होत कां? ठळकपणे दिसणाऱ्या, सर्वाना ठाऊक असणाऱ्या बाबल्यासंबंधीतल्या घटनांशिवाय आणि कांही घडलं होतं कां ?ते काय असू शकेल ? हे प्रश्न बाबल्याच्या संबंधात त्याला ओळखणाऱ्या सगळ्याच संवेदनशील व्यक्तीना पडले असतील.मला तरी ते अजूनही मनात येतात.

  July 19, 2022


दिनविशेष

अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

Category:

 

इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याच्या जेवणानंतरच्या डेझर्ट डिशमध्ये आइसक्रीमचा समावेश हमखास असायचा. पण तो या पदार्थाबाबतीत इतका दक्ष होता की या ‘फ्रोजन स्नो’ची माहिती कुणालाही कळू नये यासाठी त्याने आपल्या शेफला ही पाककृती लपवून ठेवण्याकरता आयुष्यभर पेन्शनची सोय केली होती असं म्हणतात.

  July 19, 2022