साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५४ – अक्कमा चेरियन

Category:

 

अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले.

  August 13, 2022


साहित्य - ललित

पांढरा शर्ट खाकी पँट

Category:

 

शैक्षणिक मुल्ये, संस्कार, निती , शैक्षणिक क्रांती हे सगळं पांढऱ्या शर्ट आणि खाकी पँट सारखं काळाच्या पडद्या आड जाऊ लागले आहे आणि ह्याला जबाबदार अशा शाळांचे चोचले पुरविणारी पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालून शिकलेली तुमची आणि आमची पिढीच आहे.

  August 13, 2022


लेखसंग्रह

एक रुबाबदार अभिनेता – विनोद खन्ना

Category:

 

गुलजार आपल्या पहिल्या मेरे अपने  चित्रपटासाठी एका वैफल्यग्रस्त तरुणांच्या भूमिकेसाठी शोध घेत होते. त्याच वेळी त्यांची नजर विनोद खन्नावर गेली. त्यांनी त्याला ती भूमिका दिली. त्याच्या या कामाला मिनाकुमारीने सुद्धा दाद  दिली.

  August 13, 2022


कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४५ )

Category:

 

विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता. ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. बायकोही दिसायला खूप सुंदर ! सुंदर म्हणजे इतकी सुंदर की एखाद्या शिल्पातील स्त्री जितकी सुंदर असते तितकी ! तरी तो माणूस बाहेरून येणाऱ्या – जाणाऱ्या मुली डोळे फाडून पाहत असतो…बोलता – बोलता त्याने लग्नानंतरही एक मुलगी कशी त्याच्या गळ्यात पडत होती त्याची रसभरीत कहाणी सांगितली

  August 13, 2022


साहित्य - ललित

सर्वाधिक उंचीवर ‘तुंगनाथ’

Category:

 

पावले तुंगनाथची वाट चालू लागतात. साधारण १ कि.मी. अंतर चालल्यावर वृक्षवल्ली आपल्याला एका सुरेख हिरव्या कुरणावर आणून सोडतात व आपला निरोप घेतात. अशा कुरणाला ‘बुग्याल’ असे म्हणतात. या पुढच्या प्रवासात मात्र कुठेही झाडे दिसत नाहीत. वातावरणात होणारा सुखद बदल स्पष्ट जाणवत असतो. समोर सोनेरी तेजाने झळकणारी पर्वतशिखरे उभी असतात.

  August 12, 2022


साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५३ – अजीजन बाई

Category:

 

अजीजन बाई एक गणिका होत्या, पण मनातून क्रांतिकारी. आपल्या जवळची सगळी संपत्ती त्यांनी नाना साहेबांना दिली, देश सेवेसाठी. फक्त धनच नाही दिले तर स्वतः त्याच्याबरोबर रणभूमीवर सुद्धा उतरल्या. त्या पुरुषाचा वेष करत, कमरेला तलवार आणि हातात बंदूक, घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरत. त्यांनी एक गणिकांची टोळी बनवली, त्याला ‘मस्तानी टोळी’ असं नाव दिलं, प्रत्येकीला बंदूक चालवायला, तलवार चालवायला शिकवलं. जखमी क्रांतीकारकांवर इलाज करणे, त्यांना खायला-प्यायला देणे, दारुगोळा पुरवणे, अशी सगळी काम अजीजन बाईच्या नेतृत्वाखाली ही मस्तानी टोळी करत असे. वीर सावरकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकात अजीजन बाईंचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, ‘अजीजन बाईंच्या हास्यावर सगळे फिदा असत, त्यांचे मधुर हास्य वीरांना प्रेरणा देत असे परत रणांगणावार जाऊन शत्रूला सामोरे जायला, परंतु एखादा जर युद्धाला पाठ दाखवून आला तर अजीजन बाई कडून त्यांना चांगलाच ओरडा बसत असे. त्या स्वतः कायम युद्धभूमीवर शत्रूवर तुटून पडत असे.’

  August 12, 2022